AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याच दिवशी तिरंगाला मिळाली होती राष्ट्रीय ध्वज म्हणून ओळख, जाणून घ्या संपूर्ण इतिहास

21 जुलै 1947 रोजी, संविधान सभेने हा ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यात एकच बदल झाला. तिरंग्यात सूत कात्याच्या जागी अशोक चक्र दाखविण्यात आले.

याच दिवशी तिरंगाला मिळाली होती राष्ट्रीय ध्वज म्हणून ओळख, जाणून घ्या संपूर्ण इतिहास
याच दिवशी तिरंगाला मिळाली होती राष्ट्रीय ध्वज म्हणून ओळख
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 2:58 PM
Share

नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात 21 जुलै हा दिवस महत्त्वपूर्ण दिवस म्हणून नोंदवला गेला. यावेळी तिरंगा हा देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला गेला. या दिवशी संविधान सभेने तिरंगा हा देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला आणि त्याला मान्यता दिली. 19व्या शतकात, जेव्हा भारत ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता, त्यावेळी देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यकर्त्यांकडून अनेक प्रकारच्या झेंड्यांचे प्रयोग केला जात होता. परंतु सन 1857 मध्ये जेव्हा स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात झाली तेव्हा असा विचार केला जात होता की देशासाठी समान ध्वज आवश्यक आहे. तथापि काही लोकांचे म्हणणे आहे की, 22 जुलै 1947 रोजी तिरंगाला संविधान सभेने मान्यता दिली होती. (know the whole history of the national flag of india )

स्टार ऑफ इंडिया काय होता?

ब्रिटिश प्रतिकांवर आधारीत असलेला पहिला ध्वज स्टार ऑफ इंडिया म्हणून ओळखला जात असे. स्टार ऑफ इंडिया हा बर्‍याच ध्वजांचा एक गट होता जो ब्रिटिश शासकांनी येथे राज्य करत असताना प्रस्तावित केले होते. 20 व्या शतकाच्या शेवटी, एडवर्ड सातवाच्या कारकिर्दीत, ब्रिटीश शासित भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या प्रतिकाची गरज भासू लागली. त्या काळी अस्तित्त्वात असलेल्या लोकप्रिय प्रतिकांमध्ये भगवान गणेश, काली माता यासारख्या प्रतीकांचा समावेश होता. परंतु हे सर्व ते एका विशिष्ट धर्मावर आधारीत आहेत असे सांगून नाकारले गेले.

बंगालच्या फाळणीने मिळाली नवी दिशा

वर्ष 1905 मध्ये बंगालची पहिली फाळणी झाली तेव्हा एक नवीन भारतीय ध्वज उदय झाला, जो देशातील लोकांना एकत्र करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला होता. हा ध्वज वंदे मातरम् ध्वज म्हणून ओळखला जात असे. ब्रिटीश राजवटीविरूद्ध स्वदेशी चळवळीच्या वेळी त्याची सुरुवात झाली. ध्वजात आठ प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे आठ पांढरे कमळे व चिन्हे होती. हा ध्वज कोलकात्यात लाँच करण्यात आला होता. त्यास माध्यमात कुठल्याही प्रकारे जागा मिळाली नाही किंवा कोणत्याही वृत्तपत्रातही त्याचा उल्लेख नव्हता. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात हा ध्वज वापरण्यात आला.

जेव्हा गांधीजींना भेट दिला झेंडा

वर्ष 1921 मध्ये अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अधिवेशनात एका तरूणाने विजयवाड्यात झेंडा बनवून गांधीजींना दिला. हे दोन रंगांचे होते. लाल आणि हिरवा रंग जो दोन मोठ्या समुदायाचे प्रतिनिधित्व करतो म्हणजेच हिंदू आणि मुस्लिम. यावेळी गांधीजींनी सूचना केली की, भारताच्या उर्वरित समुदायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सफेद पट्टी आणि देशाची प्रगती सूचित करण्यासाठी चालता चरखा असावा.

तिरंगा कसा आला

1931 हे वर्ष राष्ट्र ध्वजाच्या इतिहासात संस्मरणीय असल्याचे म्हटले जाते. तिरंगा ध्वज देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या ध्वजाने सद्य तिरंगाचा पाया तयार केला होता. हा ध्वज भगवा, पांढरा आणि मध्यभागी गांधीजींच्या चरखासह होता. त्यानंतर, 21 जुलै 1947 रोजी, संविधान सभेने हा ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यात एकच बदल झाला. तिरंग्यात सूत कात्याच्या जागी अशोक चक्र दाखविण्यात आले. (know the whole history of the national flag of india )

इतर बातम्या

Paytm चा वापर करुन सिलेंडर बुक करा आणि 900 रुपयांची डिस्काऊंट मिळवा

…तर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, खबरदारीसाठी नागपुरातील 850 सराफांना नोटीस

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.