व्हिस्की ऑन द रॉक्स.. मागवण्यााआधी अर्थ तर घ्या समजून, 99 टक्के लोकांना..
व्हिस्की ऑन द रॉक्स मध्ये दोन महत्वाचे शब्द आहेत , ते म्हणजे व्हिस्की आणि रॉक्स. त्यातील रॉक या शब्दांतच त्याची कहाणी आहे. काय आहे संपूर्ण अर्थ आणि कुठून झाली याची सुरूवात, चला जाणून घेऊया..

‘व्हिस्की ऑन द रॉक्स’… एखाद्या बारमध्ये गेल्यावर बरेच लोकं ही ऑर्डर देतात. बहुतांश लोकांना व्हिस्की अशीच पिण्याची सवय असते, पण हे नाव नेमकं कुठून आलं, त्याचा अर्थ काय याचा विचार कधी केला आहे का ? वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड सांगतात, “दारू पिणारे अनेकदा ही ओळ वापरतात, पण त्यांना ती कुठून आली हे माहित नसते. त्यामागील कारण काय आहे हेही बऱ्याच लोकांना माहीत नसतं.” ‘व्हिस्की ऑन द रॉक्सचे श्रेय स्कॉटलंडला दिले जाते, जिथे बर्फ सहज उपलब्ध नव्हता. एखादा जुगाड करून व्हिस्की आणि इतर मद्य थंड ठेवलं जायचं. याचा खरा अर्थ काय चला जाणून घेऊया.
‘व्हिस्की ऑन द रॉक्स’ची कहाणी
व्हिस्की ऑन द रॉक्स मध्ये दोन महत्वाचे शब्द आहेत , ते म्हणजे व्हिस्की आणि रॉक्स. त्यातील रॉक या शब्दांतच त्याची कहाणी आहे. स्कॉटलंडमध्ये व्हिस्की थंड करण्यासाठी बर्फाचा वापर केला जात नव्हता कारण तिथे तो सहज उपलब्ध नव्हता. म्हणून, थंड नदीच्या पाण्यात बुडवलेल्या दगडांचा वापर केला जात असे. पेयामध्ये दगड बुडवून व्हिस्की थंड केली जात असे. तसेच स्कॉटलंडमध्ये, मद्य किंवा ड्रिंक तयार करण्यासाठी पाण्याचा वापर केला जात नव्हता, म्हणून तेथे थंड दगडांचा वापर लोकप्रिय झाला. इंग्रजीमध्ये, या पद्धतीला व्हिस्की ऑन द रॉक्स असे म्हटले जात असे. अशाप्रकारे, “व्हिस्की ऑन द रॉक्स” ही ओळ वापरात आली आणि आजही ती बारमध्ये सामान्यतः वापरली जाते.
बारमधील बर्फाचं गणित घ्या समजून
अनेकांना असे वाटते की व्हिस्की किंवा इतर पेयांमध्ये बर्फ घालणे म्हणजे ते थंड करणे, परंतु हा दृष्टिकोन चुकीचा आहे. वाइन तज्ञ सोनल हॉलंड म्हणतात की पेयांमध्ये नेहमीच मोठे बर्फाचे तुकडे घालावेत. असं का करायचं, त्याचं उत्तरही त्यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणतात की, बर्पाचा तुकडा हळूहळू वितळतो, त्यामुळे त्या मद्याचा, ड्रिंकचा अरोमा कायम राहतो. त्याची चव बदलत नाही. खरंतर कोणत्याही स्वरुपातच दारू पिणं हे चुकीचं आहे. पण पण जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिस्की किंवा इतर पेयांमध्ये बर्फाचे तुकडे घालता तेव्हा त्यांचा आकार मोठा असावा. बर्फाचे छोटे तुकडे लवकर वितळतात, त्यामुळे व्हिस्की किंवा इतर अल्कोहोलिक पेयांची चव लवकर बदलते. ते सामान्य तापमानाला येऊ लागतं, म्हणूनच मोठे बर्फाचे तुकडे वापरणे चांगले असं वाईन एक्सपर्ट सोनल यांनी सांगितलं.
