Metro train : मेट्रो रेल्वेची सेवा रात्री बंद का ठेवली जाते? जाणून घ्या कारण

Metro service : मेट्रो रेल्वेची सेवा रात्रीच्या वेळी बंद असते. मेट्रो २४ तास चालवता येत नाही. रात्री ११.३० नंतर मेट्रो रेल्वे बंद होते. रात्री १२.३० ते ४.३० मेट्रो जरी बंद असली तर कर्मचारी जागे असतात. रात्री मेट्रो बंद ठेवण्यामागचे कारण काय आहे. जाणून घ्या.

Metro train : मेट्रो रेल्वेची सेवा रात्री बंद का ठेवली जाते? जाणून घ्या कारण
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 2:55 PM

Metro rail : भारतीय रेल्वेचे जाळे इतके मोठे आहे की, त्याचा जगात याबाबतीत चौथा क्रमांक लागतो. रेल्वे सेवा दिवसभर सुरु असते. लोकल सेवा तर सुरुच असते. पण आता मेट्रो रेल्वे सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण यामुळे वेळ वाचतो. दिल्ली, पुणे, मुंबईसह अनेक मेट्रो शहरांमध्ये मेट्रो ट्रेन ही आता लोकांसाठी लाईफलाइन बनली आहे. मेट्रो आता दैनंदिन प्रवासाचा एक भाग बनली आहे.

रस्त्यावरील ट्राफिकमुळे गाडीने प्रवास करणे अवघड होऊन जाते. त्यामुळे चाकरमानी रेल्वेने प्रवास करतात. मेट्रो प्रवास आता सोयीचा झाला आहे. मेट्रोची सेवा इतकी महत्त्वाची झाली आहे. पण तरी देखील ती २४ तास सेवा का देत नाही. मुंबई सारख्या शहरात रात्री पण लोकं प्रवास करत असतात. पण असलं तरी देखील एका ठराविक वेळेनंतर मेट्रोची सेवा बंद असते.

मेट्रोच्या कामकाजाची वेळ काय

सकाळी मेट्रो सेवा लवकर सुरु होते. पण रात्री उशिरा परतण्यासाठी मेट्रोचा लाभ घेता येत नाही. कारण रात्री ११.३० नंतर मेट्रो सेवा बंद होऊन जाते. मेट्रो ट्रेन सकाळी 5.30 वाजता सुरू होतात आणि रात्री 11.30 वाजता संपतात.

24/7 मेट्रो सेवा न मिळण्यामागे कारण काय

मेट्रो सकाळपासून रात्रीपर्यंत चालवली जाते. त्यामुळे त्यानंतर दुरुस्तीची गरज असते. दुरुस्ती आणि मेंटनेन्सचं काम रात्री उशिरा केले जाते. डीएमआरसीनुसार, मेट्रो २४ तास चालवता येत नाही. कारण ट्रेन आणि ट्रॅकची देखभाल रात्रीच्या वेळेत करावी लागते. सुरक्षिततेच्या कारणाने हे मेंटनेन्सचं काम केलं जातंय ट्रॅकची देखभाल करण्याचं काम रात्री 12 वाजल्यानंतर सुरु होते. जेणेकरून सकाळी रेल्वे सेवा सुरळीत सुरु राहावी. त्यामुळे रात्रीच्या वेळी मेगा ब्लॉक घेतला जातो.

मेट्रो रेल्वेचे नेटवर्क रात्री बंद

डीएमआरसीच्या मते, मेट्रो सेवा 24 तास चालवणे शक्य नाही. त्यामुळे शेवटची ट्रेन रात्री 11.30 वाजेपर्यंत धावते आणि डेपोपर्यंत पोहोचेपर्यंत ती 12.30 वाजतात. अशा स्थितीत पहाटे साडेचार पासून ती डेपोतून बाहेर पडते आणि पहाटे साडेपाच वाजता प्रवाशांना घेऊन निघते. 12.30 ते 4.30 या वेळेत सर्व रेल्वेंची आणि ट्रॅकची दुरुस्ती आणि इतर सर्व गोष्टींची चाचणी केली जाते. सुरक्षेच्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने रात्री मेट्रो सेवा बंद असते.

Non Stop LIVE Update
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन.
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप.
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना.
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?.
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार.
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?.
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं.
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.