यूपीतील एक असे मंदिर; जे सांगते हवामानाची स्थिती; जाणून घ्या यंदा कसा असेल मान्सून

साधारणत: देशातील नैऋत्य मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो. पण यावेळी एक दिवस अगोदर केरळच्या किना-यावर पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने (IMD) हा अंदाज व्यक्त केला आहे. (One such temple in UP; Which tells the weather conditions; know about monsoon this year)

यूपीतील एक असे मंदिर; जे सांगते हवामानाची स्थिती; जाणून घ्या यंदा कसा असेल मान्सून
यूपीतील एक असे मंदिर; जे सांगते हवामानाची स्थिती
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 2:57 PM

नवी दिल्ली : भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) देशातील हवामान स्थिती सांगते. पाऊस कधी पडेल, वादळ कधी येईल, वादळामुळे शेतकर्‍यांना किती नुकसान सहन करावे लागेल, अशी माहिती हवामान खात्याकडून आपल्याला आगाऊ मिळते. परंतु उत्तर प्रदेशमध्ये असे एक मंदिर आहे, जे यावेळी देशात पावसाळा कसा असेल हे सांगते. यावेळी मान्सून(Monsoon) कसा असेल याबद्दल मंदिरातील पुजारी सूचित करतात. साधारणत: देशातील नैऋत्य मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो. पण यावेळी एक दिवस अगोदर केरळच्या किना-यावर पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने (IMD) हा अंदाज व्यक्त केला आहे. (One such temple in UP; Which tells the weather conditions; know about monsoon this year)

जगन्नाथ मंदिराने दिलेले संकेत

– यूपीच्या कानपूर जिल्ह्यातील भिरगावच्या जगन्नाथ मंदिराने यावेळी मान्सून कमकुवत असल्याचे संकेत दिले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, मान्सून येण्याच्या काही दिवस आधी मंदिराच्या घुमटातील दगडातून पाण्याचे थेंब गळतात. या जमिनीवर पडणाऱ्या थेंबाच्या आकारावरुन मंदिरातील पुजारी मान्सूनचा अंदाज व्यक्त करतात.

– मीडिया रिपोर्टनुसार, मंदिराचे विद्यमान पुजारी पं. के.पी. शुक्ला म्हणाले की, दोन दिवसांपासून घुमटातून छोटे थेंब पडत आहेत. त्यानुसार यंदा पाऊस कमी होईल.

– बेहटा बुजुर गावात हे मंदिर पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. मंदिराचे पुजारी केपी शुक्ला म्हणाले की, त्यांच्या सात पिढ्या मंदिराची सेवा करीत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून घुमटातून पाणी टपकत आहे.

– जेव्हा मंदिराच्या घुमटातून पाण्याचे थेंब येणे सुरू होते, तेव्हा आजूबाजूच्या गावातील लोक शेतीची कामे करण्यास सुरवात करतात. गावात भगवान जगन्नाथ मंदिराच्या गाभाराच्या कळसावर एक दगड आहे. असा विश्वास आहे की हा दगड पावसाळ्याच्या आगमनाच्या 15-20 दिवस अगोदर पाण्याचे थेंब टपकवून संकेत देतो.

– असे म्हटले जाते की पाण्याचे थेंब कसे पडतात हे शोधण्यासाठी अनेक सर्वेक्षण केले गेले आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञांना देखील मंदिर बांधण्याचा नेमका वेळ शोधता आला नाही. असे म्हटले जाते की मंदिराचे शेवटचे नूतनीकरण 11 व्या शतकात झाले.

स्कायमेट वेदर रिपोर्ट काय सांगतो?

स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, नैऋत्य मॉन्सून 2021 ने मालदीव, कोमोरिन सागर, श्रीलंका आणि दक्षिण आणि बंगालच्या उपसागरातील मोठ्या भागात यापूर्वीच हजेरी लावली आहे. त्याचवेळी भारतीय समुद्रात एकामागून एक चक्रीवादळे आली. अरबी समुद्रावरील चक्रीवादळ तौक्ते आणि बंगालच्या उपसागरात यास वादळामुळे मान्सून वेगाने पुढे जाण्यास मदत झाली आहे. (One such temple in UP; Which tells the weather conditions; know about monsoon this year)

इतर बातम्या

आता आपला देश षडयंत्र करणाऱ्यांना जशास तसा तसे उत्तर देतोय; मोदींची ‘मन की बात’

14 वर्षांच्या मुलाकडून 13 वर्षांच्या मुलीची हत्या, पोटात 114 वेळा चाकू खुपसला

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.