आपल्या आजूबाजूची ‘ही’ माहिती सरकारला द्या आणि मिळवा ‘लाख’ रुपये, जाणून घ्या कसे…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 29, 2021 | 6:25 AM

केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. स्त्री भ्रूण हत्या कायमच्या बंद होण्यासाठी राज्य सरकारांनीही अनेक योजना सुरू केल्या आहेत. तुम्हीही सरकारच्या या उपक्रमाला हातभार लावू शकता आणि यासाठी सरकार तुम्हाला प्रोत्साहनपर पैसेही देईल.

आपल्या आजूबाजूची 'ही' माहिती सरकारला द्या आणि मिळवा 'लाख' रुपये, जाणून घ्या कसे...
Mukhbir Yojna

Follow us on

मुंबई : केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. स्त्री भ्रूण हत्या कायमच्या बंद होण्यासाठी राज्य सरकारांनीही अनेक योजना सुरू केल्या आहेत. तुम्हीही सरकारच्या या उपक्रमाला हातभार लावू शकता आणि यासाठी सरकार तुम्हाला प्रोत्साहनपर पैसेही देईल. सरकारच्या या योजनेत तुम्ही योगदान देऊन केवळ सरकारसाठीच नव्हे तर समाजासाठीही खूप चांगलं काम करु शकता, ज्यासाठी तुम्हाला बक्षीस मिळेल.

नेमकी काय आहे ही योजना, या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता, सामाजिक कार्यात आपण कशा प्रकारे योगदान देऊ शकता? हे आपण जाणून घेऊया, विशेष म्हणजे आता प्रोत्साहन रकमेमध्ये लक्षणीय वाढ केली जात आहे.

राजस्थान सरकारने पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत भ्रूण लिंग चाचणीत सहभागी डॉक्टर आणि इतरांना आळा घालण्यासाठी माहिती देणारी योजना सुरू केली होती. अलीकडे, आता या योजनेअंतर्गत दिलेल्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम अडीच लाखांवरून आता तीन लाखांपर्यंत करण्यात आली आहे. यासह, या योजनेत सरकारला सहकार्य करणाऱ्या लोकांना तीन लाख रुपये दिले जातील.

काय करावं लागेल?

वास्तविक, जन्मापूर्वी मुलाचे लिंग शोधणं किंवा पाहणं हा कायदेशीर गुन्हा आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी माहिती देणारी योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये, जर तुम्हाला अशा कोणत्याही प्रकरणाची माहिती आली, जिथे डॉक्टर हे बेकायदेशीर काम करत आहेत किंवा कोणतेही पालक देखील अशा प्रकारचं पाऊल उचलत आहेत, तर तुम्ही त्याबद्दल सरकारला कळवू शकता. जर तुमची माहिती बरोबर आढळली तर तुम्हाला सरकारकडून तीन लाख रुपये दिले जातात.

या योजनेत गर्भवती महिलेला आणि तिच्या सहकाऱ्याला एकूण तीन लाख रुपयांची प्रोत्साहन रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाते. योजनेत विहित केलेल्या अडीज लाखांच्या रकमेचा पहिला हप्ता गुन्हा दाखल झाल्यावर, दुसरा हप्ता न्यायालयात तक्रार केल्यानंतर देण्यात येईल आणि तिसरा हप्ता निर्णय आल्यानंतर दिला जाईल.

प्रोत्साहन रकमेमध्ये लक्षणीय वाढ

यापूर्वी एका गर्भवती महिलेला तीन हप्त्यांमध्ये एकूण एक लाख रुपये दिले जात होते, परंतु आता तिला प्रोत्साहन म्हणून दोन हप्त्यांमध्ये एकूण दीड लाख रुपये दिले जातील. तसेच, पूर्वी माहिती देणाऱ्याला तीन हप्त्यांमध्ये प्रति हप्ते 33 हजार 250 रुपये, असोसिएटला 16 हजार 625 रुपये प्रति हप्ता मिळत असे. पण, आता 50-50 हजार रुपये माहितीदाराला दोन हप्त्यांमध्ये आणि 25-25 हजार रुपये सहयोगीला दिले जातात.

तक्रार कुठे करणार?

तुमच्याकडे काही माहिती असल्यास तुम्ही 104/108 या टोल फ्री क्रमांकावर आणि 9799997795 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करू शकता.

(Rajasthan Government Increased reward money In PSPNDT Mukhbir Yojna Checke Here All detail)

हे ही वाचा :

Afghanistan crisis : आता अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवादी टोळ्या सक्रिय, बंदुकीचा धाक दाखवून लुटालूट

अफगाणिस्तानमध्ये 3 लाख कोटी डॉलरचा खजाना, यासाठीच अनेक महासत्तांची आक्रमणं?

3 लाख अफगाण सैन्य असतानाही, 60 हजार तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा कसा मिळवला? वाचा काय आहेत मुख्य कारणं

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI