AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वाधिक ट्रान्सलेट जगातील तो शब्द कोणता? Google च्या उत्तराने सर्वच हैराण

Most Translated Word in the world: आता ऑनलाईन ट्रान्सलेशन, अनुवाद करणे बऱ्यापैकी सोपं झालं आहे. आजही अनेक जण गुगल ट्रान्सलेशनचा वापर करतात. जगात सर्वाधिक अनुवाद झालेला कोणता शब्द आहे?

सर्वाधिक ट्रान्सलेट जगातील तो शब्द कोणता? Google च्या उत्तराने सर्वच हैराण
सर्वाधिक ट्रान्सलेट जगातील तो शब्द कोणता?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 13, 2026 | 4:03 PM
Share

Most Translated Word in the world: Google Translate सेवेला 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. या विशेष प्रसंगी Google India ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात जगात गेल्या दोन दशकात सर्वाधिक वेळा अनुवादीत झालेला शब्द ‘Thank You’ म्हणजे धन्यवाद हा आहे. हे मनाला पटणारं नाही. कारण हा शब्द साधारण आहे. पण जगात हाच शब्द सर्वाधिक वेळा अनुवादीत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. लोक, समाज यांच्यामध्ये एकमेकांना आदर दाखवण्यासाठी या शब्दाचा वापर करण्यात येतो. गुगलने याविषयीचे एक छोटे व्हिज्युअल शेअर केले आहे. त्यात हा शब्द विविध भाषांमध्ये दाखवण्यात आला आहे.

एक छोटा शब्द, पण भावना मोठी

‘Thank You’ केवळ दोन शब्दांचे एक साधारण वाक्य आहे. पण त्याचे महत्त्व जगातील जवळपास सर्वच भाषा आणि संस्कृतीत दिसते. लोक हा शब्द सन्मान, आदर, आभार आणि एकमेकांशी चांगला व्यवहार करण्यासाठी वापरतात. त्यामुळेच हा शब्द Google Translate मध्ये सर्वाधिक वेळा अनुवादीत करण्यात आला आहे. सोशल मीडियावर गुगल ट्रान्सलेटच्या या पोस्टला युझर्सने भरभरून प्रेम दिले आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्यात त्यांनी ‘Thank You’ या शब्दाला त्यांच्या मातृभाषेत काय म्हणतात हे कमेंटमध्ये सांगितले आहे.

2006 मध्ये सुरू झाले होते Google Translate

Google Translate ची सुरूवात वर्ष 2006 मध्ये झाली होती. सुरुवातीला ही सेवा जगातील अगदी मोजक्या भाषेसाठीच होती. पण हळू हळू या सेवेचा विस्तार करण्यात आला. हा जगातील सर्वात आवडता ट्रान्सलेशन टुल्स झाला. आज वेबसाईट, Android आणि iOS प्लेटफॉर्मवर गुगल ट्रान्सलेट सेवा उपलब्ध आहे.

सुरुवातीच्या काळात Google Translate स्टॅटिस्टिकल मशीन ट्रान्सलेशन या तंत्रज्ञानावर काम करत होते. म्हणजे सिस्टिममध्ये त्या शब्दांचे अर्थ फीड करण्यात आले होते. त्यानुसार गुगल ट्रान्सलेशन अनुवाद करून देत होते. पण आता कंपनीने यामध्ये AI आधारीत तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे अनुवाद अधिक जलद, अचूक आणि हुशारीने करण्यात आला आहे.

Google ने गेल्या काही वर्षात भारतीय भाषा आणि बोलीभाषांमध्ये सुद्धा अनुवादाची सेवा सुरू केली आहे. आता हिंदी, पंजाबी, बंगाली, तामिळ, तेलुगु, मराठी, उर्दू आणि इतर अनेक क्षेत्रीय भाषांमध्ये अनुवाद करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. भारतासारख्या बहुभाषिक देशात माहिती आदान-प्रदान करण्यात यामुळे मोठी सुविधा निर्माण झाली आहे.

Follow Us
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका