AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: सोशल मीडियावरील ‘त्या’ फोटोमुळे अर्शदीप सिंग अडचणीत, बीसीसीआयच्या नियमाची पायमल्ली

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना बीसीसीआयच्या काही गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे कठोर नियमावली आखण्यात आली आहे. असं असताना अर्शदीप सिंगचा एक फोटो सोशल मीडियावर वादाचं कारण ठरला आहे. या फोटोत अर्शदीप सिंग गर्लफ्रेंड समरीन सोबत होता.

IPL 2026: सोशल मीडियावरील 'त्या' फोटोमुळे अर्शदीप सिंग अडचणीत, बीसीसीआयच्या नियमाची पायमल्ली
IPL 2026: सोशल मीडियावर 'त्या' फोटोमुळे अर्शदीप सिंग अडचणीत, बीसीसीआयच्या नियमाची पायमल्लीImage Credit source: PTI
| Updated on: May 13, 2026 | 4:03 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना काही प्रकरणांमुळे बीसीसीआयचा संताप झाला आहे. त्यामुळे कठोर नियम पाळण्याच्या सूचना सर्वच फ्रेंचायझींना दिल्या आहेत. असं असताना पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग रूमर्ड गर्लफ्रेंड समरीन कौरमुळे चर्चेत आला आहे. खरं तर या स्पर्धेत अर्शदीप सिंगची कामगिरी हवी तशी झालेली नाही. पण भलत्याच कारणांमुळे चर्चेत येत आहे. अर्शदीप सिंग आणि त्याची गर्लफ्रेंड समरीन कौर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. व्हायरल फोटोनुसार, हे दोघंही टीमच्या बसमध्ये एकत्र बसले होते. सोशल मीडियावरील दाव्यानुसार, अर्शदीप सिंग आणि समरीन कौरने पंजाब किंग्सच्या बसमधून प्रवास केला. यामुळे बीसीसीआयच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे. पण व्हायरल फोटोची पुष्टी टीव्ही 9 करत नाही.

बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, खेळाडूंच्या बसमधून कुटुंबातील कोणताही सदस्य प्रवास करू शकत नाही. फ्रेंचायझी यासाठी वेगळ्या बसचं नियोजन करते आणि त्यातूनच कुटुंबियांना प्रवास करण्याची अनुमती असते. पण व्हायरल होत असलेल्या फोटोत अर्शदीप सिंग आणि त्याची गर्लफ्रेंड समरीन कौर एकत्र प्रवास करत असल्याचं दिसत आहे. बीसीसीआयने नियमांचं कठोर पालन करण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत. त्यामुळे अर्शदीप सिंगने नियम मोडल्याने त्याच्यावर काय कारवाई होते, याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. आधीच काही घटनांमुळे बीसीसीआयचा संताप झाला आहे. त्यामुळे सरसकट सर्वच फ्रेंचायझींना बीसीसीआयने ताकीद दिली आहे. असं असताना या व्हायरल फोटोनंतर बीसीसीआयच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

दरम्यान, पंजाब किंग्सची विजयाची गाडी रूळावरून घसरली आहे. सलग विजयानंतर पंजाब किंग्सला 16 गुणांचं गणित सोडवणं कठीण झाल्याचं दिसत आहे. सुरूवातीला सात पैकी एकही सामना गमावला नव्हता. पण त्यानंतर सलग चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पंजाब किंग्सला राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पंजाब किंग्सचा पुढचा सामना 14 मे रोजी मुंबई इंडियन्सशी होणार आहे. त्यानंतर आरसीबी आणि लखनौ यांचं आव्हान असेल.

Follow Us
नाराज छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार? काही जण काम न करताच...
नाराज छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार? काही जण काम न करताच...  त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?