AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs SRH: बॅटला बॉल लागला आणि स्टम्पवर आदळला, तरी नाबाद राहिला फलंदाज! असं कसं झालं

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 56व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला 82 धावांनी नमवलं. पण असं असताना या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. सनरायझर्स हैदराबादच्या एका फलंदाजाला नशिबाची साथ मिळाली.

GT vs SRH: बॅटला बॉल लागला आणि स्टम्पवर आदळला, तरी नाबाद राहिला फलंदाज! असं कसं झालं
बॅटला बॉल लागला आणि स्टम्पवर आदळला, तरी नाबाद राहिला फलंदाज! असं कसं झालंImage Credit source: Screenshot/ JioHotstar
| Updated on: May 13, 2026 | 3:23 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत आता टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी जोरदार चुरस आहेत. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स स्पर्धेतून बाद झाल्यानंतर 8 संघांमध्ये खऱ्या अर्थाने लढाई आहे. असं असताना गुजरात टायटन्सने टॉप 4 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली आणि 16 गुणांचं गणित सोडवलं आहे. अधिकृतरित्या अजूनही प्लेऑफचं तिकीट मिळालेलं नाही, पण टॉप 4 मध्ये जागा पक्की झाली आहे. 12 मे रोजी गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि 169 धावांचं लक्ष्य सनरायझर्स हैदराबादसमोर ठेवलं. हे लक्ष्य गाठताना सनरायझर्स हैदराबादचे धडाधड विकेट पडले. अवघ्या 86 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. हा सामना गुजरात टायटन्सने 82 धावांनी जिंकला आणि गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं. पण या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा एक फलंदाज लकी ठरला.

सनरायझर्स हैदराबादने विजयी धावांचा पाठलाग करताना पावरप्लेमध्ये 32 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे सलील अरोराच्या वाटेला लवकर फलंदाजी आली. इतकंच काय तर त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. त्याच्यासोबत अनुभवी फलंदाज हेनरिक क्लासेन होता. पण खेळपट्टी अशी होती की धावा करणं सोपं नव्हतं. यावेळी सलील अरोराने दोन तीन चौकार मारत धावा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डावाचं आठवं षटक टाकण्यासाटी कगिसो रबाडा आला. सलिलने या षटकाच्या चौथ्या चेंडूचा सामना करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला फार यश आलं नाही. चेंडू बॅटला लागला आणि थेट स्टम्पवर आदळला. अरोरा चेंडू स्टम्पला लागण्यापासून रोखू शकला नाही.

अरोराने डिफेन्सिव शॉट खेळला आणि चेंडू बुटाला लागला आणि मागे आला. त्यावेळी सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांची धाकधूक वाढली. कारण चेंडू मागे स्टम्पवर आदळला. पण सुदैवाने बेल्स काही पडल्या नाहीत. त्यामुळे नाबाद राहिला. क्रिकेट नियमानुसार बेल्स पडल्याशिवाय बाद दिलं जात नाही. जीवदान मिळाल्यानंतर सलीलने एक चौकार मारला. पण 10व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. सलीलला नशिबाची साथ मिळाली पण फार काळ टिकू शकला नाही.

Follow Us
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल.
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह.......
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह........
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम.