Explainer: वादळवारा सुरु असताना पावसासोबत गारा का पडतात? ढगात बर्फ कसा तयार होतो?
वादळ आणि पावसाबरोबरच कधीकधी आकाशातून अचानक बर्फाचे गोळे पडतात, ज्याला आपण गारांचा पाऊस म्हणतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, की आकाशातील ढगांमध्ये बर्फ कसा तयार होतो आणि गारा कशा बनतात? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

वादळी पावसादरम्यान पाऊस पडतो आणि कधीकधी आकाशातून बर्फाचे गोळेही पडतात, ज्यांला आपण गारा म्हणतो. यामुळे शेतीचं मोठं नुकसान होतं. गारा या बर्फाचे गोळे असतात. उष्णता आणि गरमीच्या हवामानात या गारा आकाशात कशा तयार होतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ढगांमध्ये बर्फाचे हे गोळे कसे बनतात? तर, वादळी ढगांच्या वरच्या भागात इतकी थंडी असते की पाण्याबरोबरच त्यात बर्फाचे छोटे-छोटे तुकडे तयार होतात. वादळी ढगांमधील हवेचा प्रवाह या बर्फाच्या तुकड्यांना इकडेतिकडे फिरवतो. शेवटी, पाण्यापासून तयार झालेल्या गारा इतक्या मोठ्या आणि जड होतात की त्या जमिनीवर पडू लागतात. गारा कशा तयार होतात? ...
