AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात घर खरेदी करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

पावसाचा हंगाम केवळ गारवा आणि निसर्ग सौंदर्य घेऊन येत नाही, तर घर खरेदीसाठीही एक संधी घेऊन येतो. चला तर मग जाणून घेऊया, अशा कोणत्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या सांगतात की, आत्ताच प्रॉपर्टी खरेदी करणे का योग्य ठरेल...

पावसाळ्यात घर खरेदी करण्याचे 'हे' आहेत फायदे
| Edited By: | Updated on: Jul 10, 2025 | 1:59 PM
Share

पावसाळ्याचा हंगाम केवळ गारवा आणि निसर्गसौंदर्य घेऊन येत नाही, तर तो घर खरेदीसाठीही एक अत्यंत महत्त्वाचा आणि योग्य काळ मानला जातो. जर तुम्ही नवीन घर किंवा प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल, तर सध्या सुरू असलेला पावसाचा काळ तुमच्यासाठी योग्य संधी घेऊन आला आहे. घराची मजबुती, परिसरातील पायाभूत सुविधा आणि होम लोनवरील व्याजदर अशा अनेक गोष्टींचा खरी चाचणी याच काळात होते. त्यामुळे घर खरेदी करण्याआधी पावसाळा अनेक पैलूंना समजून घेण्याचा योग्य काळ आहे. चला तर मग, जाणून घेऊया अशा कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या सांगतात की पावसाळा घर खरेदीसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरू शकतो.

1. घराची गुणवत्ता तपासण्यासाठी योग्य

कोणतेही घर घेताना त्याचे आकर्षक लूकपेक्षा अधिक महत्त्व त्याच्या टिकाऊपणाला दिले पाहिजे. पावसाच्या काळात छतांवरून गळती होते का, भिंतींवर ओलावा आहे का, बाथरूममध्ये पाणी साचते का, दरवाजे आणि खिडक्या नीट बंद होतात का याची तपासणी शक्य होते. काही ठिकाणी पावसामुळे पाणी साचते का हे देखील याच काळात स्पष्ट दिसते. त्यामुळे घर खरेदीपूर्वी अशी निरीक्षणं केल्यास भविष्यातील त्रास वाचवता येतो.

2. रस्त्यांची आणि परिसराची खरी स्थिती समजते

घर घेताना केवळ घरच नव्हे तर त्या परिसरातील पायाभूत सुविधा, म्हणजेच रस्ते, नाली व्यवस्था, पाणी व वीज पुरवठा यांचाही विचार केला पाहिजे. पावसात अनेक रस्त्यांवर पाणी साचते, ट्रॅफिकची समस्या वाढते, वीज वारंवार जाते. काही वेळा बिल्डर आकर्षक वायदे करतात की घर मुख्य रस्त्याशी जोडलेले आहे, पण प्रत्यक्षात कच्चे रस्ते किंवा खराब ड्रेनेज यामुळे खूप त्रास होतो. ही सर्व स्थिती फक्त पावसातच दिसते.

3. होम लोनचे व्याजदर कमी असते

RBI ने रेपो रेटमध्ये घट केल्यानंतर अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी आपल्या होम लोनच्या व्याजदरात कपात केली आहे. युनियन बँक 7.35% दराने तर SBI 7.50% दराने होम लोन देत आहे. पंजाब नॅशनल बँकेनेही आपले दर 8% वरून 7.45% पर्यंत कमी केले आहेत. अशा वेळी घर खरेदीसाठी ही संधी चुकवू नये.

4. विजेची अडचण आणि सोयी-सुविधांची चाचणी करता येते

पावसाळ्यात काही ठिकाणी सतत वीज जात असते, आणि अनेक भागांत काही तासांपर्यंत लाईट येत नाही. त्यामुळे घर खरेदी करताना त्या भागात वीजपुरवठा कसा आहे, बिल्डिंगमध्ये जनरेटरची सोय आहे का, पार्किंग व कॉमन एरिया साठी बॅकअप आहे का याची तपासणी करावी. विशेषतः जेव्हा तुम्ही शहराच्या बाहेरच्या किंवा शांत परिसरात घर घेत असता, तेव्हा ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.