AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jeans : जीन्स पँटला छोटा खिसा का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नाही; तुम्हीही त्यातलेच…

तुम्ही नेहमी जीन्स वापरत असाल. हजारदार तुम्ही जीन्स घेतली असेल. अनेक व्हरायटीच्या जीन्स पाहिल्या असतील. या जीन्समधील एका गोष्टीकडे तुमचं लक्षही गेलं असेल. पण तुम्ही त्याचा कधी विचार केला नसेल. या जीन्सला एक छोटा खिसा असतो. त्याचा कशासाठी उपयोग होतो ते माहीत आहे का तुम्हाला?

Jeans : जीन्स पँटला छोटा खिसा का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नाही; तुम्हीही त्यातलेच...
| Updated on: Aug 27, 2024 | 12:11 PM
Share

जीन्स पँट घालणं हा एक ट्रेंडही आहे आणि आजकालची फॅशनही आहे. मुली असो की मुलं सर्वजण जीन्सला प्राधान्य देतात. मॉल आणि दुकानांमध्ये तर यंग ब्रिगेड जीन्सच खरेदी करताना दिसते. जीन्सचा लूकच नाही तर कलरही तरुणांना अधिक भावतो. जीन्समुळे व्यक्तीमत्त्व रुबाबदार दिसतं. कोणतेही कपडे तुम्ही त्यावर परिधान करू शकता, इतकी जीन्स चांगली वाटते. शिवाय जीन्समध्ये अनेकांना कन्फर्टेबलही वाटतं. त्यामुळे तरुण तरुणी जीन्सलाच सर्वाधिक प्राधान्य देतात.

तुम्ही जीन्स अनेक दिवस न धुताही वापरू शकता. तरीही जीन्स अस्वच्छ दिसत नाही. जीन्सचा कपडाच असा असतो की अनेक दिवस न धुताही जीन्स अत्यंत चांगली दिसते. त्यामुळेच प्रत्येकाला जीन्सचं वेड लागलं नाही तर नवलंच. जीन्सचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात. वाढती मागणी आणि बदलती फॅशन यानुसार या जीन्स बाजारात आलेल्या आहेत. त्यामुळे जीन्सबद्दलची तरुणांची क्रेझ अधिकच वाढलेली असते.

छोटा खिसा का असतो?

तुम्ही जीन्स परिधान करताना त्याच्या मागे पुढे एक छोटासा खिसा पाहिला असेल. पण त्या छोट्या खिश्याचा वापर कशासाठी असतो? जगातील 99 टक्के लोकांना त्याची माहिती नाही. तुम्हीही त्यातलेच. तुम्हीही नेहमी जीन्स खरेदी करता पण तुम्हालाही याबाबतची माहिती नसणारच. तुम्ही या छोट्या खिश्याला अनेकदा पाहिलं असेल, पण त्याचा कधी विचार केला नसेल. या छोट्या खिश्याचा काही वापर होतोय असं तुम्हाला वाटतं का? चला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देऊनच टाकू. तुम्हाला अधिक गोंधळात टाकून उपयोग नाही.

गोष्ट दीडशे वर्षापूर्वीची

जीन्समध्ये दिसणाऱ्या या छोट्या खिश्याला वॉच पॉकेट किंवा फोब पॉकेट असंही म्हटलं जातं. घड्याळ, सुट्टे पैसे, चावी किंवा अन्य छोट्या वस्तू सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने हा छोटा खिसा करण्यात आलेला आहे. 19 व्या शतकात हा छोटा खिसा जीन्समध्ये आवतरला. त्यापूर्वी जीन्सला हा छोटा खिसा नव्हता. त्या काळात पुरुष आपल्या खिशात घड्याळ घेऊन जायचे. त्यामुळे त्यांचे घड्याळ सुरक्षित राहावे म्हणून हा वेगळा छोटा खिसा तयार करण्याची कल्पना आली आणि रूढ झाली. केवळ घड्याळ खिशात ठेवण्यासाठीच हा खिसा तयार केला गेला. आता मात्र, काळ उलटलाय. लोक खिशात घड्याळ ठेवत नाहीत. हातात घड्याळ घालतात. आता तर मोबाईलमुळे घड्याळ घालण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. मात्र, असं असलं तरी दीडशे वर्षापूर्वी रूढ झालेली ही छोट्या खिशाची परंपरा अजूनही सुरू आहे. अजूनही जीन्सला हा छोटा खिसा आहे. हल्ली मुलं या खिश्याचा वापर करत नाही. पण या खिश्यामुळे जीन्सला लूक येतो हे ही तितकंच खरं.

छोटी खिसा, मोठे फायदे

जीन्समधील या छोट्या खिश्याचे अनेक फायदे आहेत. या छोट्या खिश्यात घड्याळ आणि इतर छोट्या गोष्टी सुरक्षित राहू शकतात. बाईकची चावी किंवा तुमच्या ऑफिसच्या लॉकरची चावीही तुम्ही खिशात ठेवू शकता. हल्ली तर एअरबडही खिश्यात ठेवता येतो. नाणी, एखादं बिल, डॉक्टरांची प्रिस्किप्शनची चिठ्ठी, यूएसबी ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह आदी गोष्टीही या छोट्या खिश्यात ठेवता येतात. शिवाय या वस्तू खिश्यातून काढण्यास ही सोप्या असतात.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.