दहापट किंमतीत विकू शकता आपल्याकडील जुनी नोट, जाणून घ्या याबाबद्दल सविस्तर माहिती

काही नोट नंबरमुळे, काही नोट्स राज्यपालांची सही किंवा जुनी झाल्यामुळे विशेष बनतात. मार्केटमध्ये लक्झरी नंबरपासून 786 नंबरच्या नोटा अधिक विकल्या जातात. (You can sell 100 rupee note at ten times the price, know the details about it)

दहापट किंमतीत विकू शकता आपल्याकडील जुनी नोट, जाणून घ्या याबाबद्दल सविस्तर माहिती
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 5:47 PM

नवी दिल्ली : आपण दैनंदिन जीवनात रोजच आर्थिक व्यवहार करतो. दररोज आपल्या हातात अनेक नोटा येतात आणि बर्‍याच नोटा निघून जातात. आपण फक्त ही नोटा किती फाटलेल्या नाही किंवा जुन्या नाहीत ना, या गोष्टींवर लक्ष देतो. परंतु, आपणास माहित आहे का आपल्या हातात ठेवलेली नोट खूपच मौल्यवान असू शकते आणि ती दुसर्‍या गोष्टीसाठी उपयोगात आणली जाऊ शकते. आता लोक बर्‍याच ऑनलाईन वेबसाईटवर अशा नोट्सही विकत आहेत आणि लोक त्या विकतही घेत आहेत. काही नोट नंबरमुळे, काही नोट्स राज्यपालांची सही किंवा जुनी झाल्यामुळे विशेष बनतात. मार्केटमध्ये लक्झरी नंबरपासून 786 नंबरच्या नोटा अधिक विकल्या जातात. तर जुन्या नोटांचा संग्रह करण्याचा शौक असणारे लोक चांगल्या किंमतीत ते खरेदी करतात. त्याचप्रमाणे, अशा अनेक नोटा आहेत ज्या आपल्याला अगदी साधारण वाटू शकतात पण त्या कोणासाठी तरी विशेष असतील. (You can sell 100 rupee note at ten times the price, know the details about it)

लक्झरी नंबर आणि जुन्या नोटला मोठी मागणी

लक्झरी नंबरच्या नोट्स बर्‍याच ऑनलाईन वेबसाईटवर महागड्या किंमतीत विकल्या जात आहेत. यामध्ये जसे 888888 क्रमांकाच्या नोटचा समावेश असू शकते, तसेच 123456 नंबरची नोटही आहे. याशिवाय बर्‍याच लोकांना जुन्या नोटा खरेदी करायच्या असतात, ज्यामध्ये राज्यपालांच्या सहीमुळे त्यांचे मूल्य वाढते. बरेच लोक स्वातंत्र्यपूर्व काळातील नोट्स किंवा नाणी खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

सामान्य नोटांचाही होते किंमती विक्री

उदाहरणार्थ आपल्याकडे 220769 नंबर असलेली एखादी नोट आहे. प्रथम जेव्हा आपण पाहिले तर आपल्याला त्यामध्ये काही विशेष वाटणार नाही. परंतु, जर हे तारखेला बदलल्यास ते 22 जुलै 69 असे होते. अशा परिस्थितीत ती एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख असू शकते किंवा त्याच्या आयुष्यातील खास तारीख असू शकते. कदाचित एखाद्या विशिष्ट दिवसाची तारीख असू शकते किंवा त्या दिवशी आपल्या एखाद्या खास व्यक्तीचा जन्म झाला असेल. यामुळे या प्रकारच्या नोटादेखील बऱ्याच विकल्या जात आहेत. त्याचप्रमाणे नोटवर 150847 नंबर असेल तर ही एक सामान्य संख्या आहे परंतु एखादा 15 ऑगस्ट 47 शी संबंध जोडून विकत घेऊ शकतो.

इकॉनॉमिक्स वेबसाईटसह बर्‍याच वेबसाईट्स होते विक्री

अशा नोटांची अनेक वेबसाईट्स विक्री केली जाते. ऑनलाईन ईकॉमर्स वेबसाईट इकॉनॉमिक्स वेबसाईटवरही अशाच प्रकारच्या नोटा विकल्या जातात. अशा परिस्थितीत, कोणीही इकॉनॉमिक्स वेबसाईट्सवर खाते तयार करुन नोटा विकू शकते. ज्यांच्याकडे युनिक नोट किंवा युनिक क्रमांकाची नोट असेल तर ते चांगल्या किंमतीत ती विकू शकतात.

लाखो रुपये किंमतीत विकल्या जातात नोटा

राज्यपाल बी.सी. रामराव यांची सही असलेली 100 रुपयांची जुनी नोट coinbazzar.com वर 16000 रुपयांना विकली जात आहे. तर 1957 सालातील राज्यपाल एच.एम. पटेल यांची स्वाक्षरी केलेले एक रुपयांच्या नोटांचे बंडल 45 हजार रुपयांना विकले जात आहे. या नोटांचा अनुक्रमांक 123456 आहे. याशिवाय राज्यपाल एस. व्यंकटारामन यांची सही असलेल्या 500 रुपयांच्या जुन्या नोटांचे पाकिट 1.55 लाख रुपयांमध्ये ऑनलाईन विकले जात आहे. या नोटांचा अनुक्रमांक 1616 पासून सुरू होतो. (You can sell 100 rupee note at ten times the price, know the details about it)

इतर बातम्या

‘या’ भारतीय खेळाडूमुळे कसोटी क्रिकेट पाहावसं वाटत, इंग्लंड क्रिकेटपटूची कबुली

Kalyan : आता कल्याण-भिवंडी प्रवास सुस्साट, दुर्गाडी नव्या खाडी पुलावरील दोन लेन सुरू होणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.