T20 World Cup 2021 : मेंटॉर धोनी लागला कामाला, पहिल्याच दिवशी प्रशिक्षकांसह सपोर्ट स्टाफचा क्लास!

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

T20 World Cup 2021 : मेंटॉर धोनी लागला कामाला, पहिल्याच दिवशी प्रशिक्षकांसह सपोर्ट स्टाफचा क्लास!
MS Dhoni

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. खरंतर तो टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत मैदानात खेळताना दिसणार नाही. पण तो मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंना कित्येक मोलाचे सल्ले देणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या कर्तृत्वाचा टीम इंडियाला पुन्हा एकदा फायदा होणार आहे. कारण महेंद्रसिंग धोनी आता या विश्वचषकात टीम इंडियासाठी मेन्टॉरची भूमिका निभावणार आहे. विशेष म्हणजे ही भूमिका निभावण्यासाठी तो मैदानात कामाला सुद्धा लागला आहे. (20 World Cup 2021: MS Dhoni back in blue Jersey, mentor Dhoni talk with Ravi Shastri and other support staff)

‘मेंटर’ सिंग धोनीने सर्वप्रथम टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसोबत बैठक घेतली. ही बैठक बंद खोलीत नव्हे तर मैदानावर झाली, ज्यात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर देखील उपस्थित होते. धोनी या सर्वांशी चर्चा केली. पण त्याने सर्वाधिक चर्चा फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याशी केली.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाच्या जर्सीत दिसत आहे. या फोटोत माहीसह इतर ज्येष्ठ आजी-माजी खेळाडूदेखील आणि सपोर्ट स्टाफदेखील आहे. टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला रविवारपासून सुरुवात झालीय. याच दिवशी टीम इंडियादेखील मैदानात सराव करताना दिसली. बीसीसीआयने ट्विट केलेल्या फोटोत टीम इंडियाचे शिलेदार मैदानावर सरावासाठी जमल्याचं बघायला मिळालं. या ट्विटसोबत बीसीसीआयने जे कॅप्शन दिलंय त्यामध्ये धोनीचा उल्लेख ‘किंग’ असा केला आहे. किंगचं टीम इंडियात आम्ही स्वागत करतोय, असं कॅप्शन फोटोला देण्यात आलं आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात आयपीएलमध्ये चेन्नईने नुकतीच जशी बाजी मारली ते पाहिल्यानंतर धोनी आणखी काही वेळ टीम इंडियात कार्यरत राहायला हवा होता, अशी इच्छा हजारो क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. विशेष म्हणजे धोनीने 74 व्या स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याच्या लाखो चाहत्यांचा हिरमोड झाला होता. पण त्याच्या कौशल्याचा विचार करुन अखेर बीसीसीआयने धोनीला पुन्हा टीम इंडियात महत्त्वाची जबाबदारी दिली. तो टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियासाठी मेन्टॉरची भूमिका निभावत आहे. त्यासाठी तो कामाला देखील लागला आहे.

24 ऑक्टोबरपासून भारताची मोहीम सुरु

टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पाकिस्तानच्या विरोधात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी भारताचे दोन सराव सामने होणार आहेत. विशेष म्हणजे टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी भारताने 15 खेळाडूंची निवड केली आहे, त्यापैकी 7 भारतीय खेळाडू असे आहेत, जे पहिल्यांदाच या स्पर्धेचा भाग असतील. म्हणजेच, आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये त्यांचे पदार्पण दिसेल. त्या 7 भारतीयांपैकी चौघांचे पदार्पण 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याद्वारे होईल, अशी शक्यता आहे.

इतर बातम्या

युवराज सिंगला हरियाणा पोलिसांकडून अटक अन् सुटका, चहलला अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल FIR

टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

T20 World Cup मध्ये 7 भारतीय क्रिकेटपटूंचं पदार्पण, पाकिस्तानला भिडून चौघे दाखवणार रुबाब

(20 World Cup 2021: MS Dhoni back in blue Jersey, mentor Dhoni talk with Ravi Shastri and other support staff)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI