राज्यात तब्बल 4 लाख 90 हजार नव्या मतदारांची नोंद

राज्यात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत जवळपास 5 लाख नव्या मतदारांची (Voters in Maharashtra) नोंद झाली आहे. राज्य निवडणूक (Maharashtra election commission) आयोगानेच याबाबतची आकडेवारी (Voters in Maharashtra) जाहीर केली.

राज्यात तब्बल 4 लाख 90 हजार नव्या मतदारांची नोंद
8. डिजिटल मतदार ओळखपत्रांचा सगळ्यात जास्त फायदा म्हणजे वेळेची बचत.

मुंबई : राज्यात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत जवळपास 5 लाख नव्या मतदारांची (New Voters in Maharashtra) नोंद झाली आहे. राज्य निवडणूक (Maharashtra election commission) आयोगानेच याबाबतची आकडेवारी (New Voters in Maharashtra) जाहीर केली. मुख्य निवडणूक अधिकारी (Maharashtra election commission) कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत नव्याने 4 लाख 90 हजार 050 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 अशी झाली आहे.

राज्यात पनवेल मतदारसंघात सर्वाधिक जास्त म्हणजेच 5 लाख 57 हजार 507 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 98 हजार 719 आहे तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 58 हजार 605 इतकी आहे.

सर्व्हिस मतदार म्हणून 173 पुरुष आणि 10 महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अभियानानंतर या मतदारसंघात एकूण 576 नव्या मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असल्याने आता या मतदारसंघात एकूण 5 लाख 58 हजार 083 मतदार आहेत.

राज्यात वडाळा मतदारसंघात सर्वाधिक कमी म्हणजेच 2 लाख 03 हजार 776 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 06 हजार 219 आहे तर महिला मतदारांची संख्या 97 हजार 515 इतकी आहे. सर्व्हिस मतदार म्हणून 40 पुरुष आणि 2 महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

मतदार नोंदणी अभियानानंतर या मतदारसंघात एकूण 224 नव्या मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असल्याने आता या मतदारसंघात एकूण 2 लाख 04 हजार इतके मतदार आहेत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI