दुसऱ्या लग्नाच्या हट्टाला कुटुंबाचा विरोध, 75 वर्षाच्या वृद्धाची आत्महत्या

दुसरे लग्न करण्यासाठी मुलांनी विरोध केल्यामुळे एका वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील बरेली येथे घडला. अरशद असं या मृत व्यक्तीचे नाव आहे.

दुसऱ्या लग्नाच्या हट्टाला कुटुंबाचा विरोध, 75 वर्षाच्या वृद्धाची आत्महत्या


भोपाळ (मध्य प्रदेश) : दुसरे लग्न करण्यासाठी मुलांनी विरोध केल्यामुळे एका वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील बरेली येथे घडला. अरशद असं या मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यक्तीचे वय 75 होते. या वृद्द व्यक्तीला दुसरे लग्न करायचे होते. पण मुलांनी विरोध केल्यामुळे त्यांनी घरात गळफास घेत आत्महत्या केली. बरेलीतील काशीराम कॉलनी येथून मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

अरशद यांच्या पहिल्या पत्नीचा काही दिवासंपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न करण्याचे ठरवले. हे त्यांच्या मुलांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या वडलांची समजूत काढली. तुम्ही जर दुसरे लग्न केलं तर आपल्या कुटुंबाची इज्जत जाईल. त्यामुळे दुसऱ्या लग्नाचा हट्ट करु नका, असं मुलांनी सांगितले.

यानंतर मुलांचा सतत विरोध होत असल्याने त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे अरशद यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI