जावयाची दारु सोडवण्यासाठी जाताना काळाचा घाला, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

मांजरसुंबा-पाटोदा रोडवर ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात झाला (Accident in Beed) आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

जावयाची दारु सोडवण्यासाठी जाताना काळाचा घाला, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

बीड : मांजरसुंबा-पाटोदा रोडवर ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात झाला (Accident in Beed) आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बीडमधील पाटोदा रोडवर ही घटना घडली. या अपघातात मृत्यू झालेले ऊसतोड मजूर असून ते जावयाच्या दारुचे व्यसन सोडवण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला (Accident in Beed) घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, मांजरसुंबा- पाटोदा रोडजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर बोलेरो गाडी पाठीमागून येऊन आदळली. या ट्रकमध्ये जवळपास 11 मजूर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर आहे. या सर्व रुग्णांना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले (Accident in Beed) आहे.

ट्रकमध्ये असलेले सर्व कामगार हे ऊस तोड मजूर होते. हे सर्वजण दारुचे व्यसन सोडवण्यासाठी निवडुंगवाडीला जात होते. त्याचवेळी हा अपघात घडला. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण जावयाच्या दारुचे व्यसन सोडवण्यासाठी जात होते. मृत झालेले सर्व हे एकाच गावातील रहिवाशी आहे. मृतांमध्ये सासरे आणि जावयासह नातेवाईकांचा समावेश आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वैजनाथ ज्ञानोबा तांदळे, बाळू पंढरीनाथ मंडे, केसरबाई बन्सी मुंडे अशी मृत झालेल्या रहिवाशांची नावे आहेत. दरम्यान अद्याप तिघांची ओळख स्पष्ट झालेली नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI