Sushant Singh Rajput | रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल होताच अंकिता लोखंडेचं ट्वीट

अभिनेत्री अंकिता लोखंडेने "विजय सत्याचाच", असं ट्वीट केलं आहे. रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंकिताने हे ट्वीट केलं आहे.

Sushant Singh Rajput | रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल होताच अंकिता लोखंडेचं ट्वीट


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी (Actress Ankita Lokhande Tweet) सुशांतचे वडील के. के. सिंह यांनीच त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर अभिनेत्री आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने एक ट्वीट केलं आहे. अंकिताच्या या ट्वीटने बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलं आहे (Actress Ankita Lokhande Tweet).

अभिनेत्री अंकिता लोखंडेने “विजय सत्याचाच”, असं ट्वीट केलं आहे. रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंकिताने हे ट्वीट केलं आहे. अंकिताने केवळ ‘विजय सत्याचाच’ इतकेच लिहिलेला फोटो ट्वीट केला आहे. त्याला कोणताही संदर्भ किंवा हॅशटॅग, मेन्शन नाही. मात्र, सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी त्याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रियाविरोधात गुन्हा दाखल होताच अंकिताने ट्वीट केल्यामुळे चाहत्यांनी हा संदर्भ जोडला आहे.

अंकिता लोखंडेचं ट्वीट –

रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारमध्ये पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात रिया चक्रवर्तीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. “रियाने सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले” असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.

हेही वाचा : धर्मा प्रॉडक्शन्स आणि सुशांतमध्ये कुठलाही वाद नाही, चौकशीत अपूर्व मेहतांनी सर्व आरोप फेटाळले

सुशांतच्या वडिलांचे पाटण्यात दोन मोठे आरोप

1. रियाने सुशांतच्या खात्यातून तब्बल 15 कोटी रुपये अशा एका खात्यात वळते केले, ज्याच्याशी सुशांतचं काही देणं घेणं नव्हतं.

2. रियाने सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशांसाठी त्याचा वापर केला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“रियाने सुशांतला फसवलं. तिने त्याच्याकडून पैसे घेतले. तसेच त्याला कुटुंबापासून पूर्णपणे वेगळे केले. त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले” असे सुशांतचे वडील म्हणाले. या तक्रारीनुसार रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियावर कलम 341, 342, 380, 406, 420, 306 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

पाटणा पोलीस याबाबत क्रॉस वेरिफिकेशन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांना सगळ्यात आधी मुंबईतील नोडल ऑफिसर डीसीपी क्राईम ब्रांचची परवानगी घ्यावी लागणार.

केस डायरी, 37 जणांचे जबाब पाहावे लागणार, रियाला आणि तिच्या कुटुंबियांना ताब्यात घेण्यापूर्वी मुंबई पोलिसांकडून महिला पोलिसांची मागणी करावी लागणार. जा खात्यात 15 कोटी रुपये ट्रान्सफर झाले, त्या खात्याची चौकशी पाटणा पोलीस आज करणार आहेत. रियाला ताब्यात घेण्यासाठी पाटणा पोलिसांना एक दिवसाचा अवधी लागू शकतो (Actress Ankita Lokhande Tweet).

रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत

गुन्हा दाखल झाल्यानंतर रियाने वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची तयारी केली आहे. मुंबईतील सांताक्रुझमध्ये असलेल्या रियाच्या घरी बिहार पोलीस जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रियाने आपल्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनाची तजवीज केली आहे. रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करु शकते. यासंदर्भात तिने वकील सतीश मानशिंदे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

Actress Ankita Lokhande Tweet

संबंधित बातम्या :

सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात ट्विस्ट, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा

सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी महेश भट्ट यांची 2 तास कसून चौकशी, करण जोहरलाही समन्सची शक्यता

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI