सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी महेश भट्ट यांची 2 तास कसून चौकशी, करण जोहरलाही समन्सची शक्यता

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब नोंदवला (Sushant Singh Rajput Suicide Case).

सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी महेश भट्ट यांची 2 तास कसून चौकशी, करण जोहरलाही समन्सची शक्यता

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज (27 जुलै) प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब नोंदवला (Sushant Singh Rajput Suicide Case). यावेळी सांताक्रुज पोलिसांनी जवळपास 2 तास महेश भट्ट यांना प्रश्न विचारत कसून चौकशी केली. महेश भट्ट सकाळी 11:30 वाजता सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहचले. यानंतर मुंबई पोलीस झोन 9 चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्यासह एकूण 3 अधिकाऱ्यांनी महेश यांचा जबाब नोंदवला.

सकाळी साडेअकरा वाजता सुरु झालेली ही चौकसी जवळपास 2 तास सुरु होती. पोलिसांनी महेश भट्ट यांना चौकशीसाठी बांद्रा पोलीस स्टेशनला बोलावले होते. तेथे माध्यमांनी गर्दी केल्यानंतर महेश भट्ट यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांताक्रुज पोलीस स्टेशनला चौकशी करण्याचा आग्रह केला. यानंतर मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची सांताक्रुज पोलीस स्टेशनवर चौकशी करत जबाब नोंदवला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मुंबई पोलीस अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी करत आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी अनेक नामवंत लोकांचे जबाब नोंदवले आहेत. यात आदित्य चोप्रा यांच्यासह सुंशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचाही समावेश आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

करण जोहरलाही समन्स पाठवला जाण्याची शक्यता

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (27 जुलै) या प्रकरणी बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट आणि करण जोहरचीही चौकशी होणार असल्याची माहिती दिली. आवश्यकता असल्यास करण जोहरला देखील उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं.

आतापर्यंत पोलिसांनी 38 पेक्षा जास्त लोकांचे जबाब नोंदवले आहेत. यात सुशांतचे कुटुंबिय, त्याचे नातेवाईक, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांचा समावेश आहे.

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे. (Sushant Singh Rajput Suicide Case Karan Johar may call for Investigation)

संबंधित व्हिडीओ :


हेही वाचा :

Sushant Singh Rajput Suicide | करण जोहरला चौकशीसाठी बोलवलं जाणार : गृहमंत्री

घराणेशाहीला ‘चेकमेट’ करण्यासाठी ‘क्वीन’ मैदानात, सुशांत आत्महत्या प्रकरणी जबाब देण्यासाठी कंगनाचे पोलिसांना पत्र

“कंगनाचे अख्खे करिअर कंपूशाहीवर आधारित” नगमाच्या आरोपांनंतर सोशल मीडियावर जुगलबंदी

Sushant Singh Rajput Suicide Case

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *