अभिनेत्री नेहा पेंडसेचा साखरपुडा?

अनिश बेंद्रे

Updated on: Aug 14, 2019 | 2:48 PM

अभिनेत्री नेहा महाजनने गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा आहे. नेहाने एका तरुणासोबतचा रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसेचा साखरपुडा?

मुंबई : मराठमोळी ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसेचा साखरपुडा झाल्याची चर्चा आहे. या चर्चांना सुरुवात होण्याचं कारण ठरलं ते नेहाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो. मिलानमधील कॅथेड्रलसमोर एका तरुणाचा हात धरुन डोळ्यात डोळे घालत उभं असतानाचा फोटो नेहाने शेअर केला आहे. अवघ्या काही मिनिटांतच नेहावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.

हा रोमँटिक फोटो शेअर करताना नेहाने हार्टच्या इमोजी व्यतिरिक्त काहीच लिहिलेलं नाही. मात्र इमोजी इतकी बोलकी आहे, की चाणाक्ष चाहत्यांना अंदाज बांधायला फार वेळ लागला नाही. विशेष म्हणजे नेहाने या फोटोमध्ये त्या तरुणाला टॅगही केलं आहे. त्याचं नाव आहे शार्दुल सिंह बायस.

View this post on Instagram

❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

आता शार्दुलला टॅग केलं म्हटल्यावर त्याच्या प्रोफाईलला भेट देण्याची संधी कोण सोडणार. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शार्दुलने हा फोटो जुलै महिन्यातच शेअर केला आहे. त्यावर ‘हॅपिली इन लव्ह’ असं कॅप्शनही दिलं आहे. या फोटोचं कॅप्शन आधी ‘हॅपिली एंगेज्ड’ होतं, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आढळतो.

View this post on Instagram

Happily in love ????

A post shared by Shardul Singh Bayas (@shardulbayas) on

नेहा आणि शार्दुल यांच्या नात्याला कुटुंबीयांचीही मान्यता असल्याचं दिसत आहे. शार्दुलने नेहा आणि त्याच्या कुटुंबासोबत शेअर केलेल्या एका फोटोला ‘फॅमिली’ असं कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram

Family

A post shared by Shardul Singh Bayas (@shardulbayas) on

नेहा पेंडसेने शेअर केलेल्या फोटोखाली तिच्या चाहत्यांनी तर शुभेच्छा दिल्या आहेतच, पण तिची घट्ट मैत्रीण आणि अभिनेत्री श्रुती मराठे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, कोरिओग्राफर फुलवा खामकर, अभिनेता गौरव घाटणेकर, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, निखिल महाजन, सुखदा खांडकेकर यांनीही कमेंटमधून शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बॉसच्या घरात हजेरी

नेहा पेंडसे नुकतीच ‘बिग बॉस 12’मध्ये झळकली होती. नेहाने ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेत मुख्य भूमिका केली होती, तर ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’ या डान्स रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीतही तिने मजल मारली होती. टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. 1996 मधील ‘हसरतें’ या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. त्यानंतर ‘मे आय कम इन मॅडम?’ या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती. फॅमिली टाईम विथ कपिलमध्येही नेहा दिसली होती. प्यार कोई खेल नही, देवदास, दिल तो बच्चा है जी अशा बॉलिवूडपटांमध्येही ती झळकली होती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI