Rhea Chakraborty Arrest | रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

आज तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी होत होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली.

Rhea Chakraborty Arrest | रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक
Follow us
| Updated on: Sep 08, 2020 | 4:03 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे (Rhea Chakraborty Arrested By NCB). आज सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी सुरु होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. सायंकाळी साडे चार वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोव्हिड चाचणी केली जाणार आहे (Rhea Chakraborty Arrested By NCB).

आज सकाळी साडे नऊ वाजल्यापासून एनसीबी रियाची चौकशी करत होती. काल आणि परवा तब्बल 10 तास रियाची  चौकशी झाली.

गेल्या तीन दिवसांपासून एनसीबी रियाची सतत चौकशी करत होती. गेले दोन दिवस तिची दहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आजच्या पाच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केली. त्यानंतर तिला आरोग्य तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. सध्या एनसीबी कार्यालयाच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कुठल्याही आरोपीला अटक केल्यानंतर त्याची कोव्हिड चाचणी केली जाते. अटकेपूर्वीची ही सर्व प्रक्रिया असते. त्यासाठी रियाला सायन रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

रिया अटकेसाठी तयार, वकील सतीश मानेशिंदे यांची माहिती

रिया अटकेसाठी तयार असल्याची माहिती तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रविवारीच दिली होती. “जर एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल, तर तिला तिच्या प्रेमाचे परिणाम भोगावे लागतील. निर्दोष असल्याने, तिने बिहार पोलिसांसह सीबीआय, ईडी आणि एनसीबीने दाखल केलेल्या केसमध्ये अटकपूर्व जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतली नाही” असे ते म्हणाले होते.

एनसीबीच्या कार्यालयातील महिलांच्या कोठडीची साफसफाई

एनसीबीच्या कार्यालयातील महिलांच्या कोठडीची साफसफाई झाल्याने रियाच्या अटकेचे स्पष्ट संकेत मिळू लागले होते.

रियाचा भाऊ शोविकलाही चार दिवसांपूर्वी अटक

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला चार दिवसांपूर्वीच एनसीबीने अटक केली होती. त्याच्यासोबत सॅम्युअल मिरांडालाही अटक झाली. या सर्वांची चौकशी सुरु आहे. गेल्या आठ दिवसात एनसीबीने केलेली ही दहावी अटक आहे. त्यापैकी तिघा जणांना जामीन मंजूर झाला आहे. रिया आणि शोविकच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये बड्स आणि डब्ज या ड्रग्ज तस्करीत वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक शब्दांचा वापर केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच एनसीबीने यांच्याभोवतीचा फास आवळला आहे.

सुशांतच्या बहिणीविरोधात रियाची वांद्रे पोलिसांत तक्रार

काल सायंकाळी 7 वाजता एनसीबीच्या चौकशीनंतर रिया थेट वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये सुशांत सिंगची बहीण प्रियंका सिंहविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी आली. तक्रारीत रियाने प्रियांकावर सुशांत सिंह बेकायदेशीर आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत सुशांत सिंह यांना डॉक्टरांनी सांगितलेली औषधे न दिल्याबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती.

तब्बल 6 तासांनंतर वांद्रे पोलिसांच्या वतीने रियाच्या तक्रारीवरुन सुशांत सिंहची बहीण प्रियंका सिंह, डॉक्टर तरुण कुमार, मितू सिंह आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये आयपीसीचे मुख्य विभाग लादले गेले आहेत. 420, 464, 465, 466, 468, 474, 306 120 बी / 34 आयपीसी आणि कलम 8 (1), 21,22, 29 एनडीपीएस अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एफआयआरमध्ये आरोपींनी बनावट प्रिस्क्रिप्शन औषधाची पर्ची न ठेवता सरकारी रुग्णालयाच्या लेटर हेडचा वापर करुन आणि डॉक्टरांच्या निर्देशांशिवाय सुशांतला एनडीपीएस कायद्यांतर्गत बंदी घातलेली औषधे दिली गेली होती आणि त्यामुळे अँक्सिएटी अटॅक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे आणि म्हणूनच एखादी व्यक्ती आत्महत्या करु शकते.

Rhea Chakraborty Arrested By NCB

संबंधित बातम्या :

SSR Case | एनसीबीच्या 8 तासांच्या चौकशीनंतर रिया थेट वांद्रे पोलिसांत, सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार

Rhea Chakraborty | रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार, वकिलांची माहिती; NCB कार्यालयात चौकशी

ड्रग्जप्रकरणी शौविक, सॅम्युअल मिरांडाला एनसीबी कोठडी, रियाच्या अटकेची दाट शक्यता

शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी, रियासह तिघांची एकत्रित चौकशी

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.