बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची प्रसुती, नवजात बालकाला पित्याने जिवंत पुरले

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Sep 24, 2019 | 9:32 AM

गुजरातमध्ये एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape of a minor girl) करण्यात आला, असा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. मुलीवर बलात्कार (Rape of a minor girl) केल्यानंतर ती गरोदर (Pregnant) राहिली.

बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची प्रसुती, नवजात बालकाला पित्याने जिवंत पुरले

अहमदाबाद : गुजरातमध्ये एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape of a minor girl) करण्यात आला, असा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. मुलीवर बलात्कार (Rape of a minor girl) केल्यानंतर ती गरोदर (Pregnant) राहिली. यानंतर तिने बाळाला जन्म दिला. हा पुरावा मिटवण्यासाठी आरोपीने नवजात बालकाला जिवंत पुरले. ही धक्कादायक घटना गुजरातमधील सुरत येथे घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला. सध्या गुजरात पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. अशोक असं या आरोपीचं नाव आहे.

दोन वर्षांपासून अशोक आणि पीडित मुलीमध्ये प्रेमसंबध होते. आरोपीने पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत अनेकदा संबध ठेवले. या दरम्यान मुलगी गरोदर राहिली. पण ही गोष्ट घरात कळतास मुलाने हा मुलगा माझ्या नसल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीची तक्रार केली.

दोन वर्षापूर्वी अशोक राठोड आणि माझ्या मुलीमध्ये मैत्री होती. एक दिवस कामाच्या नावाने तो माझ्या मुलीला बाहेर घेऊन गेला. ऑक्टोबर 2017 ला त्याने माझ्या मुलीवर बलात्कार केला. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि माझी मुलगी गरोदर राहिली, असं पीडित मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले.

पीडित मुलीने जेव्हा ती गरोदर असल्याचे आरोपी अशोकला सांगितले. तेव्हा मी मुलाची जबाबदारी घेण्यास तयार आहे, असं त्याने सांगितले. पण हळूहळू पीडित मुलीच्या शारीरिक बदलांमुळे घरात समजले की मुलगी गरोदर आहे. घरात समजल्यानंतर मुलाने हा मुलगा माझा नाही असे सांगत मुलीसोबत बोलणं बंद केले.

पीडित मुलीने बाळाला जन्म दिला

यानंतर जून 2018 मध्ये अशोकचा एक मित्र पीडित मुलीच्या घरी आला आणि त्यांच्या मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी बरदोली येथे घेऊन गेला. तिथून डॉक्टरांनी त्यांना सुरत येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आणि सुरत येथे पीडितेने मुलाला जन्म दिला.

पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु

आरोपी अशोक आणि त्याच्या 4 मित्रांनी मिळून त्या नवजात बाळाला सुरतपासून 20 किमी लांब असलेल्या बालेश्वर गावात जिवंत पुरले, असं म्हटलं जात आहे. यामध्ये एका डॉक्टरचाही समावेश होता. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI