कृषी विभागाकडून ‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीची दखल, कृषी विभागाकडून बोगस धान बियाणांची चौकशी

नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात बोगस धान बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. (agriculture department inquire about Bogus grain seeds) 

कृषी विभागाकडून 'टीव्ही 9 मराठी'च्या बातमीची दखल, कृषी विभागाकडून बोगस धान बियाणांची चौकशी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात बोगस धान बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ने याबाबतची बातमी दाखवलेली होती. या बातमीची दखल घेत कृषी विभागानं चौकशी सुरु केली आहे.  (agriculture department inquire about Bogus grain seeds)

मौदा तालुका कृषी अधिकारी संदीप नागाडे आणि पुंडलिक जुमडे यांनी मौदा तालुक्यातील धान पिकांची पाहणी केली आहे. या पाहणीदरम्यान केलेल्या चौकशीत शेतकऱ्यांच्या शेतातील 30 ते 40 टक्के बियाणं बोगस असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या बोगस धान बियाण्य़ांमुळे नागपूर जिल्ह्यात शेकडो शेतकऱ्यांना फटका बसला आहे. एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च करुन शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केली. पीक वाढवलं. पण आता उत्पादन न आल्याने शेतकऱ्यांना एकरी 30 ते 40 हजारांचा फटका बसला आहे.

दोन दिवसांपूर्वी ‘टीव्ही 9 मराठी’ने ही बातमी दाखवली होती. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या कृषी विभागाने बोगस बियाण्याची चौकशी सुरु केली आहे.(agriculture department inquire about Bogus grain seeds)

संबंधित बातम्या : 

व्याघ्र प्रेमींसाठी खुशखबर, ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले

Satara | साताऱ्यातील शिक्षकाची ‘अक्षर’बाग; विद्यार्थ्यांना लावली वाचनाची गोडी

Published On - 10:25 am, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI