AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara | साताऱ्यातील शिक्षकाची ‘अक्षर’बाग; विद्यार्थ्यांना लावली वाचनाची गोडी

ऑनलाईन शिक्षणात येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढत सातारा जिल्ह्यातील निंबळक येथील शिक्षकाने 'अक्षरबाग' उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाद्वारे मुलांना वाचनाची गोडी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. (Ravindra Jangam started initiative aksharbag for first standard students )

Satara | साताऱ्यातील शिक्षकाची 'अक्षर'बाग; विद्यार्थ्यांना लावली वाचनाची गोडी
| Updated on: Oct 01, 2020 | 7:36 PM
Share

सातारा : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करत आहे. मुलांपर्यंत शिक्षण कसे पोहचवायचं, हा मोठा प्रश्न शासनाला आणि शिक्षण विभागाला पडला होता, यादरम्यान ऑनलाइन शिक्षणप्रणाली सर्वत्र सुरु झाली. शिक्षणासाठी मोबाईल हा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातला महत्वाचा घटक बनला. ऑनलाईन शिक्षणातील विविध अडचणींमुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांना बाराखडी शिकवणे, अडचणीचे झाले होते. फलटण तालुक्यातील निंबळक येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेतील शिक्षक रवींद्र जंगम यांनी या अडचणींवर उपाय शोधत ‘अक्षरबाग’ हा अनोखा उपक्रम सुरु करत विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्याचा प्रयत्न सुरु केलाय.  (Ravindra Jangam started initiative aksharbag for first standard students )

सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील निंबळक येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील रवींद्र जंगम या शिक्षकाने “अक्षरबाग” हा उपक्रम सुरु केला. रवींद्र जंगम या उपक्रमाद्वारे मुलांना वाचनाची गोडी लावण्याचा अनोखा प्रयत्न करत आहेत. पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या घराच्या अंगणात, घराशेजारच्या जागेत गादीवाफा करून त्यात अक्षरांची चाकोरी तयार करण्यास सांगितली गेली. त्यामध्ये गहू,ज्वारी, बाजरी , मका असे उपलब्ध धान्य पेरण्यात आले. गादीवाफ्यात अंकुरित होणारी ही छोटी बाग मुलांना अक्षरांची ओळख करुन देत आहे. मुलेही वाढत जाणाऱ्या उगवत्या अक्षरांकडे कुतुहलाने पाहात वाचनाचे धडे गिरवत आहेत. यामुळे रवींद्र जंगम यांनी हा राबविलेल्या उपक्रमाला यश येत आहे.

ऑनलाईन शिक्षणात येणाऱ्या अडचणींवर पर्याय

एक दोन – मुले शिकणाऱ्या घरात एकच मोबाईल संच असणे ,त्यासाठी नेट कनेक्टिव्हिटी, रेंज, डेटा आणि मोबाईल साक्षरता, असे अडथळे ऑनलाईन शिक्षणात निर्माण झाले. ऑनलाईन शिक्षणाद्वारे पहिल्या वर्गातील मुलांना मराठी बाराखडी शिकवणे मोठे आव्हान बनले होते. रवींद्र जंगम यांनी अक्षरबाग उपक्रमाद्वारे या अडचणींवर पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. मुलांना शिकविण्यासाठी पालकांची सोबत असेल तर हे काम थोडे सुलभ होते. हे सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत अध्यापन करणाऱ्या शिक्षकाने दाखवून दिले आहे.

इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागणे गरजेचे असते. अक्षरबागेच्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अक्षरओळख होईल. अक्षर वाढत जातील तशी विद्यार्थ्यांची वाचनाची गोडी वाढेल, असे मत रवींद्र जंगम यांनी व्यक्त केले.

संबंंधित बातम्या:

ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग खडतर, सोलापुरातील शिक्षकांचा भिंतींवरील शिक्षणाचा नवा प्रयोग

लॉकडाऊनमध्ये गावी अडकली, ऑनलाईन शिक्षणासाठी नेटवर्क नाही, डोंगरदऱ्यात झोपडी टाकून तरुणीचा अभ्यास

(Ravindra Jangam started initiative aksharbag for first standard students )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.