लॉकडाऊनमुळे पुण्यातील प्रदूषणात घट, हवामानाच्या गुणवत्तेत वाढ 

लॉकडाऊनमुळे पुण्यातील प्रदूषणात घट, हवामानाच्या गुणवत्तेत वाढ 

पुण्यातील अतिसूक्ष्म धुलिका कणांमध्ये 35 टक्के तर नायट्रोजन ऑक्साईड या घटकांमध्ये 70 टक्के घट झाली (Pollution Decrease in Pune) आहे.

Namrata Patil

|

May 10, 2020 | 9:27 AM

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Pollution Decrease in Pune) आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुण्यात लॉकडाऊनमुळे प्रदूषणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अतिसूक्ष्म धूलिका आणि नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण घटले आहे. इतकंच नव्हे तर वायू प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषणातही घट झाली आहे.

हवामान शास्त्र संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे पुण्यातील (Pollution Decrease in Pune) अनेक कारखाने आणि औद्यगिक कारभार बंद आहेत. त्यामुळे शहर आणि इतर परिसरातील प्रदूषणाच्या प्रमाणात 50 ते 60 टक्क्यांनी घट झाली आहे. अतिसूक्ष्म आणि नायट्रोजन ऑक्साईड या प्रदूषण घटकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील हवामानाची गुणवत्ता वाढली आहे.

पुण्यातील अतिसूक्ष्म धुलिका कणांमध्ये 35 टक्के तर नायट्रोजन ऑक्साईड या घटकांमध्ये 70 टक्के घट झाली आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरात कमी प्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे. नायट्रोजन ऑक्साईड हा फुफ्फुसांठी घातक असतो. त्यामुळे कफ होऊन सर्दीचं प्रमाण वाढतं.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात जवळपास 65 लाख लोक राहतात. यात भागातून दररोज किमान 70 ते 80 लाख वाहनांची वर्दळ असते. यात दुचाकी, बस, ट्रक, रिक्षा आणि खासगी वाहनांचा समावेश आहे.

या वाहनांतील जळणाऱ्या इंधनामुळे पुण्यात धुलिकणाचे प्रदूषण 60 ते 80 टक्के होते. तर उर्वरित प्रदूषण हे कारखान आणि इतर कारणांनी होते. मात्र लॉकडाऊन असल्याने कारखाने बंद आहेत. शिवाय रस्त्यावर केवळ अत्यावश्यक वाहन धावत असल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषणही घटले (Pollution Decrease in Pune) आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार, दिवसभरात 1,165 नवे रुग्ण

संगमनेरमध्ये एकाच दिवसात 7 कोरोना रुग्ण, नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 51 वर

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें