इकडे मोदींची सर्वपक्षीय बैठक, तिकडे हवाई दलप्रमुख लेहमध्ये दाखल, मिराज आणि सुखोई विमानं सज्ज

चीनसोबतच्या संघर्षानंतर भारताचे हवाई दलप्रमुख लेहच्या हवाईतळावर दाखल झाले आहेत. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. (Air Force Chief Visits Ladakh)

इकडे मोदींची सर्वपक्षीय बैठक, तिकडे हवाई दलप्रमुख लेहमध्ये दाखल, मिराज आणि सुखोई विमानं सज्ज
Military chopper and fighter jet activity seen in Leh, Ladakh
Follow us
| Updated on: Jun 19, 2020 | 6:53 PM

श्रीनगर : चीनसोबतच्या संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वपपक्षीय नेत्यांशी चर्चा करत असताना, तिकडे हवाई दलप्रमुख लेहच्या हवाईतळावर दाखल झाले आहेत. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. भारत आणि चीनमधील संघर्ष वाढला आहे. चीनने विश्वासघात करत केलेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. अशा परिस्थितीत लडाखमध्ये भारतीय हवाईदल सज्ज झालं आहे. (IAF Chief R K Bhadauria visits ladakh )

भारताची वायूसेना अलर्ट असून, स्वत: वायूदलाचे प्रमुख RKS भदौरिया बुधवारी रात्री लेहमध्ये दाखल झाले आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली असली तरी हवाई दलाच्या प्रवक्तांकडून याबाबत अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही. (IAF Chief R K Bhadauria visits ladakh )

तणावाच्या स्थितीत हवाई दलप्रमुखांनी लेह-लडाख भागाचा दौरा केल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार RKS भदौरिया बुधवारी रात्री श्रीनगर-लेह या एअरबेसवर पोहोचले. त्याआधी त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स (CDS) बिपीन रावत आणि लष्करप्रमुख एम एम नरवणे यांची भेट घेतली.

चीनसोबतच्या संघर्षात बॉर्डरवरील लेह आणि श्रीनगर हे भारतीय हवाईतळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच स्वत: RKS भदौरिया यांनी घटनास्थळी जाऊन, आवश्यक तयारीचा आढावा घेतला.

दरम्यान, भारतीय हवाई दलाने मिराज 2000 हे विमान लडाखच्या दिशेने पाठवलं आहे. हे तेच विमान आहे ज्याने बालकोटमध्ये एअर स्ट्राईक केला होता. त्याआधी सुखोई-30 हे लढाऊ विमानही अलर्ट ठेवण्यात आलं आहे.

चीनचीही तयारी दुसरीकडे चीननेही अपाचे आणि चिनूक ही लढाऊ हेलिकॉप्टर लडाखजवळ तैनात करुन ठेवली आहेत. जवानांना मदत मिळवण्याच्या हेतून त्यांनी ही हेलिकॉप्टर सज्ज ठेवली आहेत. अपाचे हे हेलिकॉप्टर कोणत्याही कठीण परिस्थितीत काम करु शकतं.

लेह परिसरात भारतीय वायूदलाच्या हालचाली चीनसोबतच्या संघर्षानंतर भारतीय हवाई दलाने श्रीनगर, अम्बाला, आदमपूर, हलवाडा यासारख्या क्षेत्रातही नजर ठेवली आहे. लेह हवाईतळावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

बरेलीतील हवाईतळही अलर्ट चिनी संघर्षानंतर लेहचं हवाईतळ अलर्टवर असताना, इकडे तिबेट रिजनजवळ असलेल्या बरेली हवाईतळही अलर्ट ठेवण्यात आलं आहे. चीनने विश्वासघात करुन 15 जूनच्या रात्री भारतीय जवानांनावर हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. चीनच्या या रडीच्या डावाविरोधात भारतात संतापाची लाट आहे.

IAF Chief R K Bhadauria visits

संबंधित बातम्या  

PM Modi All Party Meet Live | मोदींच्या अध्यक्षतेत सर्वपक्षीय बैठक सुरु, भारत-चीन तणावावर चर्चा 

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.