Ajit Pawar Plane Crash : तेच विमान, तिच घटना, याआधीही झाला होता Learjet 45XR विमानाचा भीषण अपघात, मुंबईतच…
अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, त्याच विमानाचा याआधीही असाच एक अपघात झाला होता. दृष्यमानता कमी असल्याने हे विमान लँडिंगच्या वेळी कोसळले होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीच्या दौऱ्यावर असताना विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. विमानात असलेल्या इतर चौघांचादेखील मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 29 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, अजित पवार ज्या विमानातून जात होते, त्या विमानाचा आता चर्चा होत आहे. कारण याआधीही या विमानाचा अपघात झाला होता. त्यामुळे हे विमान कोणते होते? याआधी घडलेल्या अपघातात नेमके काय झाले होते? ते जाणून घेऊ या…
अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या विमानाचे नाव ‘Bombardier Learjet 45XR’ असे होते. हे एक चार्टर विमान होते. VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड असे या विमान तयार करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी भआरतातील प्रमुख चार्टर प्लेन ऑपरेटिंग कंपन्यांपैकी एक आहे. अजित पवार प्रवास करत असलेले विमान हे एक मिड साईज बिझनेस जेट आहे. अत्याधुनिक एव्हियोनिक्स, वेग, मोठी केबीन अशी या जेट विमानाची विशेषता आहे.
1990 साली तयार झाले होते मॉडल
Learjet 45 या जेट विमानाचे मॉडल 1990 साली तयार करण्यात आले होते. या विमानाचा याआधीही असाच एक अपघात झालेला आहे. 14 सप्टेंबर 2023 रोजी हा अपघात झाला होता. earjet 45XR हे विमान तेव्हा विशाखापट्टनमहून मुंबईला येत होते. त्यावेळी मुसळधार पाऊस आणि दृश्यमानता कमी असल्याने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगवेळी ही दुर्दैवी घटना घडली होती. विशेष म्हणजे हे विमान चालवणाऱ्या पायलटकडे अधिकृत परवाना होता. या जेट विमानात एकूण 5 जण प्रवास करत होते. लँडिंग यशस्वी न होऊ शकल्याने हे विमान थेट दोन भागांत तुटले होते. सुदैवाने यातील पाचही प्रवासी फक्त जखमी झाले होते. कोणतीही जीवितहानी झाली निव्हती.
