अमेरीकन नागरिकांना बळजबरीने कोरोनाची लस दिली जाणार नाही : जो बायडन

जगभरातील 218 देशांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 6.66 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6.62 कोटींच्याही पुढे गेली आहे.

अमेरीकन नागरिकांना बळजबरीने कोरोनाची लस दिली जाणार नाही : जो बायडन

वॉशिंग्टन : नुकत्याच झालेल्या अमेरीकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांनी कोरोनावरील लसीकरणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. बायडन म्हणाले की, “अमेरिकेत (America) कोरोनावरील लस (Coronavirus Vaccine) उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणासाठी अमेरीकन नागरिकांवर जबरदस्ती केली जाणार नाही.” (Joe Biden said Americans will not be forced to take the Corona vaccine)

बायडन म्हणाले की, “कोरोनावरील लस सर्वांसाठी अनिवार्य करणे गरजेचे नाही. मी राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वतःची सर्व ताकद पणाला लावून लोकांसाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेईन”. दरम्यान, प्यू रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार केवळ 60% अमेरीकन नागरिक कोरोनावरील लस घेण्यासाठी तयार आहेत. त्यामुळेच बायडन यांनी लसीकरण सर्वांसाठी अनिवार्य नसेल, असे वक्तव्य केले आहे.

रोग नियंत्रण केंद्र सीडीसीने (Centers for Disease Control CDC) सांगितले आहे की, अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी अमेरिकेत जवळपास 225,000 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 2500 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 47 लाख 72 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 86 लाख 58 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत, तर 2 लाख 85 हजार 550 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील पहिली कोरोना लस दृष्टीपथात : पंतप्रधान

भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरील लसीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, “कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली वहिली लस (Corona Vaccine) दृष्टीपथात आली आहे. काही आठवड्यातच कोरोना वॅक्सिन तयार होईल. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करुन लशीची किंमत निश्चित करण्यात येईल”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिली. अवघ्या काही आठवड्यात लसीकरण मोहिम सुरु करणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले.

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना लस या विषयावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (4 डिसेंबर 2020) सहभागी झाले होते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपल्याला कोरोना लशीसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही, असं नरेंद्र मोदी बैठकीत म्हणाले. मी यापूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लस उत्पादनाच्या संदर्भात देशात काय तयारी आहे, याचा आढावा घेतला. वेगवेगळ्या टप्प्यावर 8 लसींची चाचणी सुरु आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या भारताच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

फायझर-बायोएनटेक कोरोना लसीला मंजुरी देणारा पहिला देश ठरला UK!

पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये UK हा पहिला देश ठरला आहे, ज्याने कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. UK सरकारनं फायझर-बायोएनटेक या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे UK मध्ये आता मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या कोरोना लसीला मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर पॉडक्ट्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी अर्थात MHRA नं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे.

MHRA ला UK सरकारनं 1 जानेवारी पूर्वी विशेष नियमांद्वारे लसीला मंजुरी देण्यासाठी अधिकृतरित्या सांगितलं होतं. येत्या काही दिवसांत लसीचा पहिला टप्पा बाजारात येईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. UK सरकारनं लसीचे 40 लाख डोस खरेदी केले आहेत, जे चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात ९५ टक्के प्रभावशाली ठरले आहेत.

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले टॉप 10 देश

अमेरिका : एकूण कोरोनाबाधित – 14,772,535, मृत्यू – 285,550
भारत : एकूण कोरोनाबाधित – 9,608,418, मृत्यू – 139,736
ब्रझील : एकूण कोरोनाबाधित – 6,534,951, मृत्यू – 175,981
रशिया : एकूण कोरोनाबाधित – 2,402,949, मृत्यू – 42,176
फ्रान्स : एकूण कोरोनाबाधित – 2,268,552, मृत्यू – 54,767
स्पेन : एकूण कोरोनाबाधित – 1,699,145, मृत्यू – 46,252
यूके : एकूण कोरोनाबाधित – 1,690,432, मृत्यू – 60,617
इटली : एकूण कोरोनाबाधित – 1,688,939 , मृत्यू – 58,852
अर्जेंटिना : एकूण कोरोनाबाधित – 1,454,631, मृत्यू – 39,512
कोलंबिया : एकूण कोरोनाबाधित – 1,352,607, मृत्यू – 37,467

संबंधित बातम्या

कोरोना लस कधी येणार? किंमत काय? सगळ्यात आधी कुणाला टोचणार? कोरोना लशीची A to Z माहिती

30 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे कोरोना लसीचे सर्वाधिक डोस, आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार!

जगभरात कोरोनाचा स्फोट, 24 तासात 6.66 लाख नव्या रुग्णांची नोंद, तर 12 हजार मृत्यू

(Joe Biden said Americans will not be forced to take the Corona vaccine)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI