AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sikandar Kher | ‘काम हवंय’ अनुपम खेर यांच्या मुलाची सोशल मीडियावर पोस्ट, दिग्दर्शकाची अशी प्रतिक्रिया…

सिकंदर खेर यांनी त्यांच्या एक फोटो शेअर करत, ‘काम हवंय. हसू ही शकतो’, असे कॅप्शन दिले होते. यावर मनोरंजन विश्वातल्या अनेक दिग्गजांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sikandar Kher | ‘काम हवंय’ अनुपम खेर यांच्या मुलाची सोशल मीडियावर पोस्ट, दिग्दर्शकाची अशी प्रतिक्रिया...
| Updated on: Nov 20, 2020 | 3:43 PM
Share

मुंबई : अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि अभिनेत्री किरण खेर (Kiran Kher) यांचा मुलगा सिकंदर (Sikandar Kher) वडिलांप्रमाणेच सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असतो. नुकतेच सिकंदर खेर यांनी त्यांच्या आगामी 3 वेब सीरीजचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आर्या’ या वेब सीरीजमध्ये ते झळकले होते. सध्या सिकंदर त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. सिकंदर खेर यांनी त्यांच्या एक फोटो शेअर करत, ‘काम हवंय. हसू ही शकतो’, असे कॅप्शन दिले होते. यावर मनोरंजन विश्वातल्या अनेक दिग्गजांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत (Anupam Kher’s Son Sikandar Kher share’s a post Asking For Work).

सिकंदर खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या फोटोत घामेजलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर काहीसे गंभीर भाव दिसत होते. तरीही गमतीत पोस्ट केलेल्या या फोटोला त्यांनी, ‘काम हवंय. हसू ही शकतो’, असे काहीसे गंभीर वाटणारे कॅप्शन दिले. मात्र, त्यानंतर त्यांच्या या पोस्टवर अनेक मजेदार कमेंट येण्यास सुरुवात झाली.

सिकंदरच्या पोस्टवर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

सिकंदर खेर यांच्या या पोस्टवर अनेक दिग्गजांच्या मजेदार प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. यामध्ये निर्माते-दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी कमेंट करत म्हटले, ‘सर अमिताभ बच्चन यांच्यानंतर सगळ्यात व्यस्त कलाकार म्हणून मी ज्यांना ओळखतो ते तुम्ही आहात…’. यावर उत्तर देताना सिकंदर म्हणतात, ‘सर तुम्हाला वाटते का मी ‘चुल्लूभर’ पाण्यात बुडून मारू?’ त्यांच्या या मजेदार कमेंट्सवर चाहत्यांनी देखील भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत (Anupam Kher’s Son Sikandar Kher share’s a post Asking For Work).

दुसरीकडे नेहा धुपियाचा पती अभिनेता अंगद बेदीने देखील सिंकदर यांच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. हसण्याचे इमोजी टाकत त्याने देखील सिकंदरचे कौतुक केले आहे. सिकंदरच्या चाहत्यांनी देखील यावर भरपूर कमेंट्स केल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत, लवकरच त्यांच्या आणखी छान छान कलाकृती आपल्या भेटीस याव्यात, अशी इच्छा प्रेक्षकांनी व्यक्त केली.

सिकंदर यांच्या नावाचा दबदबा..

सिकंदर खेर हा किरण खेर आणि त्यांचे पहिले पती गौतम बेरी यांचा मुलगा आहे. सिकंदर केवळ 3 वर्षांचा असताना किरण यांनी अनुपम खेर यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर सिकंदरने आपल्या नावासोबत ‘खेर’ हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. सिकंदर खेर यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यांचे ‘औरंगजेब’, ‘रोमिओ अकबर वॉल्टर’, ‘द झोया फॅक्टर’ हे चित्रपट तर, ‘24’, ‘आर्या’, ‘द चार्जशीट’ आणि ‘मुम भाई’ या वेब सीरीज विशेष गाजल्या. लवकरच सिकंदर रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

(Anupam Kher’s Son Sikandar Kher share’s a post Asking For Work)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.