एपीएमसीतील मुख्यलेखाधिकाऱ्यांसह सहकाऱ्याला कोरोना, एपीएमसीची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता

मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीमधील मुख्यलेखाधिकारी आणि कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

एपीएमसीतील मुख्यलेखाधिकाऱ्यांसह सहकाऱ्याला कोरोना, एपीएमसीची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीमधील मुख्यलेखाधिकारी आणि कर्मचाऱ्याला (APMC Officials Infected By Corona) कोरोनाची लागण झाली आहे. तर एका मार्केट निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी देखील जवळपास 15 ते 20 अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती. तरीदेखील याठिकाणी कोणालाही क्वांरटाईन करण्यात आलेलं नाही (APMC Officials Infected By Corona).

एपीएमसीचा अर्थिक कारभार हा मुख्यलेखाधिकारी यांच्या हातात असतो. मुख्यलेखाधिकऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याने एपीएमसीची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. प्रशासकीय इमारतीमधील अधिकाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे याठिकाणी भीतीचे वातावरण आहे.

एकीकडे नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अँटिजेंन टेस्टिंग अशा विविध उपाययोजना राबवत आहे. नवी मुंबईत कोरोना बधितांचा आकडा 26 हजार 500 पार तर आतापर्यंत 600 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे मुंबई एपीएमसीत पाचही मार्केटमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. महापालिकेतर्फे मार्केटमध्ये अँटिजेंन टेस्ट सुरु करण्यात आली. पण, टेस्ट करण्यासाठी ग्राहक, कामगार आणि व्यापारी स्वतःहून समोर येऊन टेस्ट करत नाही. यामुळे मार्केटमध्ये रुग्ण संख्येत वाढ होत आहे. मार्केटमध्ये सर्व नियम शिथील करण्यात आले असून याठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात नाही (APMC Officials Infected By Corona).

एपीएमसीमध्ये आतापर्यंत जवळपास 800 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 30 ते 35 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये व्यापारी, माथाडी कामगार, कर्मचारी यांचा समावेश आहे.

आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई एपीमसी मार्केटमध्ये रुग्ण वाढून सुद्धा एकही कोरोना केयर सेंटर आणि रुग्णवाहिका नसल्याने हजारो संख्येने येणाऱ्या ग्राहक, व्यापारी, माथाडी कामगार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना भिती वाटत आहे. त्यामुळे एपीएमसीच्या आरोग्य विभाग कोमात दिसून येत आहे.

एपीएमसीकडे स्वतःची जागा असूनसुद्धा एपीएमसी प्रशासनाने कोव्हिड सेंटर बनवले नाही. तसेच, एपीएमसीकडे अद्यापही स्वतःची एकही रुग्णवाहिका देखील नाही. ज्यामुळे कर्मचारी, व्यापारी, माथाडी कामगार, सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यासाठी दोन ते तीन तास थांबावे लागत आहे. यामुळे एपीएमसीची आरोग्य यंत्रणा सध्या कोमात दिसून येत आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 6 महिन्यापासून विविध प्रकारच्या उपयोजना करण्यात आल्या लाखो रुपये खर्च करण्यात आला मात्र सर्व उपयोजना करुनसुद्धा एपीएमसी प्रशासन अपयशी ठरले आहे.

APMC Officials Infected By Corona

संबंधित बातम्या :

नवी मुंबईतील दुकानदारांना दिलासा, दुकानं दररोज उघडण्यास आयुक्तांची परवानगी

Published On - 9:18 pm, Wed, 2 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI