खासदार इम्तियाज जलील मशिदीत नमाज अदा करण्यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात

इम्तियाज जलील काही कार्यकर्त्यांसह शहागंज मशिदीत जाऊन नमाज अदा करणार (Aurangabad MP Imtiyaz Jalil reopen masjid Live Update) होते.

खासदार इम्तियाज जलील मशिदीत नमाज अदा करण्यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात
Follow us
| Updated on: Sep 02, 2020 | 2:20 PM

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज (2 सप्टेंबर) औरंगाबादमधील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ते औरंगाबादेतील शहागंज मशिदीत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी ते कार्यालयापासून चालत रवाना झाले असताना वाटेत पोलिसांनी अडवत त्यांना ताब्यात घेतलं. (Aurangabad MP Imtiyaz Jalil reopen masjid Live Update)

इम्तियाज जलील काही कार्यकर्त्यांसह शहागंज मशिदीत जाऊन नमाज अदा करणार होते. त्यांनी कार्यालयापासून चालत आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र वाटेतच औरंगाबाद पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर जलील यांना पोलिसांच्या गाडीत बसवून ताब्यात घेण्यात आले. इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी केली.

तर दुसरीकडे जलील यांच्या आंदोलनामुळे मशिदकडे येणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावर कोणलााही परवानगी दिली जात नाही.

तसेच इम्तियाज जलील यांच्या ऑफिसबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जलील यांनी नमाज पडण्यासाठी जाऊ नये यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्नही केले. त्यांच्या कार्यालयाबाहेर शेकडो पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – मंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक, औरंगाबादेत मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार

दरम्यान, मंगळवारी इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमधील खडकेश्वर मंदिर उघडण्यासाठी निवेदन देणार असल्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. बराच काळ औरंगाबादमधील वातावरण देखील तणावपूर्ण झालं. त्यामुळे आजही शहरात कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये अद्याप धार्मिक स्थळांना उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. असं असतानाही इम्तियाज जलील यांनी केलेल्या या घोषणेमुळे पोलीस प्रशासन आणि एमआयम कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Aurangabad MP Imtiyaz Jalil reopen masjid Live Update)

संबंधित बातम्या : 

‘मशिद उघडून नमाज करणार’, खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा

‘आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.