तुरुंगातून बाहेर आलेल्या काँग्रेस नेत्याचं जंगी स्वागत, फळांचा भव्य हार उचलण्यासाठी क्रेन

तुरुंगातून बाहेर आलेल्या काँग्रेस नेत्याचं जंगी स्वागत, फळांचा भव्य हार उचलण्यासाठी क्रेन

कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case on D K Shivkumar) अखेर जामीन मिळाला आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवकुमार (Welcome of D K Shivkumar) यांचे जोरदार स्वागत केले.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 27, 2019 | 8:41 PM

बंगळुरु: कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case on D K Shivkumar) अखेर जामीन मिळाला आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवकुमार (Welcome of D K Shivkumar) यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या स्वागताच्या वेळी हजारो काँग्रेस समर्थक बंगळुरु विमानतळाच्या बाहेर जमा झाले होते. त्यांच्यासाठी भव्य असा फळांचा हारही तयार करण्यात आला होता. हा हार इतका मोठा होता की तो उचलण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला.

शिवकुमार यांच्यासाठी तयार करण्यात आलेला हार तब्बल 250 किलो सफरचंदापासून बनवण्यात आला होता. शिवकुमार यांच्या स्वागतासाठी माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलर (JDS) नेते एच. डी. कुमारस्वामी हे देखील उपस्थित होते.

डी. के. शिवकुमार यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यांना 3 सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने 23 ऑक्टोबरला त्यांना जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयाने त्यांना विनापरवानगी परदेशात जाण्यास मनाई केली आहे.

शिवकुमार यांच्या जामिनावर सुनावणी करताना न्यामुर्ती सुरेश कैत म्हणाले, “शिवकुमार हे परदेशात पळून जातील असं वाटत नाही. सर्व पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याने त्यांच्याकडून पुराव्यांशी छेडछाड होण्याचीही शक्यता नाही.”

काँग्रेसचे संकटमोचक

डीके शिवकुमार हे काँग्रेसमधील कर्नाटकचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. 2017 मध्ये जेव्हा गुजरातच्या राज्यसभेसाठी निवडणूक होणार होती, तेव्हा काँग्रेसला आमदार फुटीचं ग्रहण लागलं होतं. त्यावेळी गुजरातमधील काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी डीके शिवकुमार यांनी घेतली आणि त्यांना कर्नाटकातील एका रिसॉर्टमध्ये आणून ठेवलं. यावेळी डीके शिवकुमार यांच्यावर आयकर विभागाचे छापेही पडले होते. पण त्यांनी सर्व संकटांना सामोरं जात ही जागा काँग्रेसला जिंकून दिली.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-जेडीएसचं सरकार वाचवण्यासाठी डीके शिवकुमार यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मुंबईला बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी आल्यानंतर शिवकुमार यांना अटक करण्यात आली. तरीही त्यांनी आमदारांना भेटण्याचा हट्ट सोडला नाही. पण सरकार वाचवण्यात त्यांना यश आलं नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें