Bigg Boss | ‘बिग बॉस’कडून भेदभाव, रुबिना दिलैकचे गंभीर आरोप!

लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत.

Bigg Boss | ‘बिग बॉस’कडून भेदभाव, रुबिना दिलैकचे गंभीर आरोप!
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 1:47 PM

मुंबई : लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता या भांडणामध्ये बिग बॉसलाही ओढण्यात आले आहे. रुबिना दिलैक हिने बिग बॉस भेदभाव करत असल्याता आरोप केला आहे. विशेष म्हणजे रुबिना दिलैकने दुसऱ्यांदा हा आरोप केला आहे. यापूर्वीही ‘बिग बॉस सीझन 13’मध्ये रश्मी देसाई आणि असिम रियाझ यांनी अशाच प्रकारचा आरोप केला होता. आता 14व्या पर्वामध्येही बिग बॉसवर भेदभाव करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Bigg Boss season 14 Rubina Dilaik vs Bigg Boss) ‘बिग बॉस 14’ची स्पर्धक रुबिना दिलैक ही सध्या खूपच चर्चेत आहे. पुन्हा एकदा तिने बिग बॉसवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. शेवटच्या एपिसोडमध्ये रुबिना दिलैकने बिग बॉसवर भेदभाव करण्याचा आरोप केला होता. यापूर्वी सलमान खान आणि बिग बॉसविरोधात भेदभाव करत असल्याचा आरोप करत रुबिना दिलैकने बंड पुकारला होता.

कॅप्टनपदाची धुरा एजाजच्या हातात बिग बॉसच्या घराचा नवीन कॅप्टन एजाज बनला आहे. रुबिना दिलैक आणि तिच्या टीमच्या म्हणण्यानुसार, एजाज नाहीतर अभिनव घराचा कॅप्टन झाला पाहिजे होता. रुबिना दिलैकच्या मते, एजाजच्या टीमने नियमांचे उल्लंघन जास्त केले तरी, देखील बिग बॉसने त्याकडे दुर्लक्ष केले आणि एजाजला घराचा कॅप्टन केले. बिग बॉसने जाणुनबुजून त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष केले, असे म्हणत तिने पुन्हा एकदा बिग बॉसवर भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता सलमान खान शनिवारी आणि रविवारी याबद्दल रुबिना दिलैकला काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही बिग बॉसवर अनेक हंगामात अशाच प्रकारचा आरोप करण्यात आले होते. ‘कलर्स’ वाहिनीच्या ‘बिग बॉस’ (Bigg Boss 14) या रियालिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू या स्पर्धकाने मराठी भाषेची चीड येत असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन मनसे आणि शिवसेना आक्रमक झाल्यानंतर VICOM 18 पाठोपाठ, जान कुमार सानू यानेदेखील माफी मागितली आहे. जानने मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वादंग उठल्यानंतर बिग बॉसच्या घरात जान याला कन्फेशन रुममध्ये बोलवण्यात आलं. यावेळी त्याला कोणतीही भाषा, धर्म आणि जात, सांप्रदाय यावर बिग बॉसच्या घरात चर्चा करण्यास मनाई असल्याचं सूचित करण्यात आलं. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात सर्वप्रकारच्या भाषा, जाती-धर्माच्या लोकांचं स्वागत केलं जातं, असंदेखील ठणकावून सांगण्यात आलं. त्यानंतर जानने माफी मागितली कलर्स टीव्हीचा माफीनामा! या प्रकरणी माफी मागताना, कलर्स टीव्हीने पत्रात म्हटले की, ‘कलर्स वाहिनीवर 27 ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये मराठी भाषेसंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी मिळाल्या.आम्ही या आक्षेपांची नोंद केली आहे आणि आम्ही ते ज्या ठिकाणी बोललं गेलं आहे तो भाग प्रसारित होणाऱ्या सर्व एपिसोड्समधून काढतो आहोत.मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखवली गेली, याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक अमूल्य आहेत. शिवाय सगळ्या भाषा सन्मानीय आहेत.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | जान सानूच्या ‘भाषावादा’नंतर ‘बिग बॉस’च्या घरात वाजले ‘झिंगाट’ गाणे!

जान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही! : प्रताप सरनाईक

(Bigg Boss season 14 Rubina Dilaik vs Bigg Boss)

Non Stop LIVE Update
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.