Bihar Election ! सर्वात मोठा पक्ष तरीही तेजस्वी यादव सत्तेच्या खुर्चीपर्यंत का पोहचू शकले नाहीत?; ‘ही’ आहेत चार कारणे!

बिहारमधील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरूनही राजद नेते तेजस्वी यादव सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. (Due to these reasons Tejashwi Yadav not becoming Chief Minister)

Bihar Election ! सर्वात मोठा पक्ष तरीही तेजस्वी यादव सत्तेच्या खुर्चीपर्यंत का पोहचू शकले नाहीत?; 'ही' आहेत चार कारणे!
भीमराव गवळी

| Edited By: Namrata Patil

Nov 11, 2020 | 12:52 PM

बिहार: बिहारमधील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरूनही राजद नेते तेजस्वी यादव सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. राजदला सर्वाधिक 75 जागा मिळाल्या. तरीही तेजस्वी यादव मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्याला चार कारणे कारणीभूत आहेत. यात अंतर्गत राजकारणापासून ते सोशल इंजिनीअरिंगचा समावेश असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. (Bihar Election: Due to these reasons Tejashwi Yadav not becoming Chief Minister)

बिहार निवडणुकीचे निकाल मध्यरात्री 3 वाजता जाहीर झाले. 243 जागांपैकी एनडीएला 125 तर महागठबंधनला 110 जागा मिळाल्या आहेत. भाजपने 74, जेडीयूने 43, राजदने 75 आणि काँग्रेसने 19 जागा जिंकल्या आहेत. तेजस्वी यादव यांनी प्रचारसभांमध्ये गर्दी खेचण्यात यश मिळवले. पण या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर करण्यात त्यांना फारसं यश आलं नाही. पक्षाची रणनीती काही प्रमाणात चुकल्यानेच त्यांना सत्तेची खुर्ची मिळू शकली नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट

बिहारच्या संपूर्ण निवडणुकीत गुन्हेगारी आणि जंगलराज हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी होता. त्यामुळे तेजस्वी यांच्यासारखं युवा नेतृत्व काही तरी वेगळा निर्णय घेईल असं वाटत होतं. मात्र, पक्षातील बुजुर्ग नेत्यांची लॉबी त्यांच्यावर वरचढ ठरली. त्यामुळे त्यांना नातेवाईकांना आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना तिकीट द्यावे लागले. गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेले अनंत सिंह, बलात्काराचे आरोपी राजबल्लभ यादव यांची पत्नी विभा देवी, बाहुबली आनंद मोहन यांची पत्नी लवली आनंद आणि त्यांच्या मुलांना तेजस्वी यांनी तिकीट दिलं. विरोधकांनी त्याचा प्रचारात हत्यारासारखा वापर केल्याने तेजस्वींना फटका बसला. (Bihar Election: Due to these reasons Tejashwi Yadav not becoming Chief Minister)

ओवेसी फॅक्टर

बिहारमध्ये मुस्लिम मतदार ही राजदची हक्काची व्होटबँक राहिली आहे. मात्र, यावेळी या व्होटबँकला सुरुंग लावण्यात एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यशस्वी झाले आहेत. एमआयएमने या निवडणुकीत 20 उमेदवार उभे केले होते. त्यांचा पाच जागी विजय झाला. तर 15 ठिकाणी त्यांनी भरपूर मते घेतली. यातील 14 उमेदवार सीमांचल भागातील होते. त्यामुळे राजदला मोठं नुकसान झालं. एमआयएमचे उमेदवार नसते तर राजदला 100चा आकडा गाठता आला असता असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

काँग्रेस प्रचारात कमी

जागा वाटपावेळी काँग्रेसने राजदकडून 70 जागा मिळवून घेतल्या. मात्र, या 70 जागा निवडून आणण्यासाठी लागणारी मेहनत मात्र काँग्रेसने घेतलेली दिसली नाही. या 70 पैकी केवळ 19 उमेदवारच विजयी झाले. काँग्रेसला या निवडणुकीत केवळ 27.1 टक्के मते मिळाली. तर राजदला 52.8 टक्के मते मिळाली.

राहुल गांधी यांच्या सर्वात कमी सभा

या निवडणुकीत अवघ्या 31 वर्षीय तेजस्वी यादव यांनी अडीचशेच्या वर सभा घेऊन प्रचाराचा धुरळा उडवून दिला. बिहारची सत्ता राखण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. या उलट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केवळ आठच सभा घेतल्या. त्याही बहुतेक मातब्बर उमेदवारांच्याच मतदारसंघात या सभा झाल्या. त्यामुळे काँग्रेसला बिहार जिंकायचे होते की नव्हते? असा प्रश्नही राजकीय जाणकार उपस्थित करत आहेत. काँग्रेसने किमान 40 जागा जिंकल्या असत्या तरी महागठबंधनला सत्तेचा सोपान चढता आला असता, असंही राजकीय निरीक्षक सांगत आहेत. (Bihar Election: Due to these reasons Tejashwi Yadav not becoming Chief Minister)

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये सत्ता NDAचीच, पण नितीश कुमारांना मोठा झटका, तेजस्वी तळपले!

‘मेरे हार की चर्चा होगी जरुर, मैंने जीत के बाजी हारी है’, जयंत पाटलांकडून तेजस्वी यादवांचं कौतुक

बिहारमध्ये काँग्रेसचा ‘निकाल’ लागल्याने राहुल गांधींची जैसलमेरची हॉलिडे ट्रिप रद्द?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें