Gopichand Padalkar Speech : गोपीचंद पडळकरांच्या गोष्टीतील ‘ते’ गाढव नेमकं कोण?

Gopichand Padalkar Speech : गोपीचंद पडळकरांच्या गोष्टीतील 'ते' गाढव नेमकं कोण?
गोपीचंद पडळकर, आमदार भाजप

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. मराठा आरक्षण, पूजा चव्हाण आत्महत्या अशा प्रकरणांवर पडळकर यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

सागर जोशी

|

Mar 04, 2021 | 5:58 PM

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. मराठा आरक्षण, पूजा चव्हाण आत्महत्या अशा प्रकरणांवर पडळकर यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. फुले, शाहू आंबेडकरांच्या नावानं हे सरकार आपल्या पै पाहुण्यांचीच सत्ता स्थापन करत असल्याचा घणाघात पडळकरांनी केलाय. पडळकरांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसवर जास्त असल्याचं यावेळी पाहायला मिळालं.(Gopichand Padalkar criticizes Thackeray government through the story of a donkey)

पडळकरांच्या गोष्टीतील गाढव कोण?

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना गोपीचंद पडळकरांनी एका गाढवाची गोष्ट सांगितली. पडळकर म्हणाले की, “एका गावात एक मूर्तीकार होता. त्याच्याकडे एक गाढव होता. तो मूर्तीकार आपल्या गाढवावर देवांच्या मूर्त्या ठेवून वेगवेगळ्या गावात त्या विकण्यासाठी जायचा. त्या मूर्त्यांमध्ये हनुमानाची मूर्ती, गणपतीची, दत्ताची मूर्ती असायची. गावातील लोक त्या मूर्त्यांना पाहून नमस्कार करायचे. मात्र, गाढवाला वाटायचं की लोक आपल्यालाच नमस्कार करत आहेत. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात घडलाय. ज्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेतलं त्यांना राज्यातील लोकांनी नमस्कार केला. पण त्यांना त्यांना वाटलं की लोक आपल्यालाच नमस्कार करत आहेत. जेव्हा मूर्ती विकून ते गाढव घरी परतलं तेव्हा ते बिथरलं. ते मालकावरच डाफरु लागलं. तेव्हा मालकाने त्याला सांगितलं की अरे गाढवा लोक तुला नाही तर तुझ्या पाठीवर असलेल्या देवाच्या मूर्तींना नमस्कार करत होते. त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकरांचे फोटो लावून जे फिरले त्यांना लोक नमस्कार करत नव्हते. तर फुले, शाहू आंबेडकरांचा विचार तुम्ही महाराष्ट्रात मांडला होता. लोक त्याला नमस्कार करत होते”, अशा शब्दात पडळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परिस्थिती बिघडली’

“हे राज्य फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालतं. पण पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती बिघडली. 600 पैकी 300 कोटींपर्यंत ठेवी कमी झाल्या. ज्या फुलेंच्या नावावर तुम्ही जागर घालता, त्यांच्या नावाच्या विद्यापीठाचीच अशी अवस्था करुन ठेवली आहे. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. मागासवर्गियांच्या भरतीतील आरक्षण कायमचं बंद केलं, ही तुमची विचारसरणी कुठली? फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि पै पाहुण्यांची सत्ता स्थापन करायची, त्या लोकांनी याचं उत्तर द्यायला हवं”, असं आव्हान पडळकरांनी ठाकरे सरकारला दिलं आहे.

विरोधी पक्षनेत्यांकडून पडळकरांच्या भाषणाचं कौतुक

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार पडळकर यांच्या भाषणाचं तोंडभरुन कौतुक केलं. “आज विधान परिषदेत आ. गोपीचंद पडळकर यांचे शब्द ऐकून खूप कौतुक वाटले. कारण @GopichandP_MLC यांच्या रूपाने गरिब घरातून आलेला एक नवखा तरुण,आपल्या समाजाच्या व्यथा अतिशय पोट तिडकीने सभागृहात मांडत होता. महाराष्ट्रात पुढच्या पिढीत असे तरुण घडावेत हीच अपेक्षा!” असं ट्वीट बुधवारी दरेकर यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या : 

‘मास्क लावून काळजी घ्या’, राज ठाकरेंचं नाव न घेता अजित पवारांचा टोला

बाबरी विध्वंसाचा मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात उदोउदो; कुठे आहे कॉमन मिनिमम प्रोग्राम? काँग्रेस नेत्याचाच सवाल

Gopichand Padalkar criticizes Thackeray government through the story of a donkey

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें