भाजपचा मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग, श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार; शिवसेनेचा सवाल

मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे, त्यांनी श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार? ते स्पष्ट केले पाहिजे, शिवसेनेने असा टोला भाजपला लगावला आहे.

भाजपचा मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग, श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार; शिवसेनेचा सवाल
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 7:02 AM

मुंबई : भारत-चीन सीमेवर (Indo China conflict) गेल्या काही महिन्यांपासून तणाव निर्माण झाला आहे, अशीच परिस्थितीत पाकिस्तानच्या सीमेवर प्रामुख्याने काश्मीरमध्ये आहे. यावेळी भारताने पाकिस्तानप्रमाणे (Pakistan) चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज असल्याचा सल्ला शिवसेनेने केंद्रातल्या भाजप सरकारला दिला आहे. दरम्यान भारत-पाक सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले, त्यापैकी दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेट्या महाराष्ट्रात आल्या. या शवपेट्या जवानांच्या गावी पोहोचल्या तेव्हा महाराष्ट्रातील भाजप पुढारी (BJP Leadrers) काय करीत होते? ते मुंबईत छठपूजेची मागणी करीत होते. त्यातले काही मंदिरे उघडा, मंदिरे उघडा असे शंख फुंकत होते, तर काही जण मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्यासाठी प्रेरणादायी भाषणे ठोकीत होते. देशापुढील गंभीर स्थितीचे भान विसरल्यावर दुसरे काय व्हायचे? अशी टीका शिवसेनेने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर केली आहे. अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे, त्यांनी श्रीनगरात (Srinagar) तिरंगा कधी फडकवणार? ते स्पष्ट केले पाहिजे (BJP trying attempt to remove saffron flag on BMC, will they the tricolor in Srinagar? : Shivsena)

अग्रलेखात म्हटले आहे की, चीनने पेच टाकला आहे व आम्ही हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानच्या कैचीत अडकून पडलो आहोत. कश्मीर खोऱ्यात शांतता नांदायला तयार नाही. सीमेवर धुमशान व आतमध्ये कमालीची खदखद आहे. कश्मिरातील विषय गंभीर खरेच, पण चीनची आक्रमकता व घुसखोरीकडे डोळेझाक करून चालणार नाही. ज्या जोशात पाकिस्तानचे नाव घेऊन दम भरला जातो त्याच पद्धतीने चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज आहे. वाटल्यास श्रीनगर,पाकव्याप्त कश्मीर वगैरेंवर भगवा फडकवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांची नियुक्ती करावी, पण चिनी सैन्य चारही बाजूंनी धडका देत आहे त्यांना कधी रोखणार? चीनचे काय करणार? डोकलाममध्ये चिनी सैन्य घुसले. हिमाचल, अरुणाचल, उत्तराखंडच्या सीमेवर ते घुसण्याच्या तयारीत आहे. लडाखच्या जमिनीवर ते मांड ठोकून बसले आहे. कुणाला त्याची चिंता आहे काय? असे सवाल शिवसेनेने उपस्थित केले आहेत.

चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत लडाखमध्ये घुसखोरी केली. चिनी सैन्य जे आत घुसले ते मागे जायला तयार नाही. मागे हटण्यासंदर्भात दोन देशांतील सैन्य अधिकाऱ्यांत चर्चा, वाटाघाटी सुरू आहेत. चिनी आमच्या जमिनीवर घुसले आहेत, पण चर्चा, वाटाघाटीचा मार्ग आपण स्वीकारला हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. जमीन आमची व ताबा चिनी सैन्याचा, पण चीनचे नाव घेऊन आमच्या पंतप्रधानांनी, संरक्षणमंत्र्यांनी, भाजप पुढाऱ्यांनी दम भरल्याचे चित्र दिसत नाही. हे सर्व दमबाजी प्रकरण पाकिस्तानसाठी राखीव असावे. चीनचा विषय निघालाय म्हणून सांगायचे, भारताचा मित्रदेश भूतानच्या हद्दीत चीनचे सैन्य घुसले असून डोकलामजवळचे एक गाव ताब्यात घेतले. हे गाव भूतान-हिंदुस्थानच्या सीमेवर आहे. तेथे चीनने घुसणे हे आमच्यासाठी खतरनाक आहे. त्याआधी डोकलाम सीमेवर चिनी सैन्य घुसलेच होते व तेथे भारतीय सैन्याबरोबर वारंवार झटापट झाली आहे. आता डोकलाम पार करून चिनी सैनिक आत गावात जाऊन बसले आहेत. भूतानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय सैन्याची आहे. कारण भूतान अस्थिर होणे म्हणजे भारताच्या सीमांना भगदाड पाडण्यासारखे आहे. पाकिस्तानने नव्हे तर चिनी सैन्याने आमच्या सीमा साफ कुरतडल्या असून दिल्लीश्वर डोळे झाकून हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानच्या झांज-चिपळ्या वाजवीत आहेत.

भारतीय सैन्याने गेल्या चार दिवसांत पाकच्या हद्दीत गोळाबारूद फेकून त्यांच्या चौक्या वगैरे मारल्या, बंकर्स पेटवले हे खरे, पण आमच्या हद्दीत आमचेच जवान मारले गेले. त्यातील दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेट्या महाराष्ट्रात आल्या. या शवपेट्या जवानांच्या गावी पोहोचल्या तेव्हा महाराष्ट्रातील भाजप पुढारी काय करीत होते? ते मुंबईत छठपूजेची मागणी करीत होते. त्यातले काही मंदिरे उघडा, मंदिरे उघडा असे शंख फुंकत होते, तर काही जण मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्यासाठी प्रेरणादायी भाषणे ठोकीत होते. देशापुढील गंभीर स्थितीचे भान विसरल्यावर दुसरे काय व्हायचे? कश्मीर खोऱ्यातून तिरंग्यात लपेटलेल्या जवानांच्या शवपेट्या येत आहेत, पण श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवणे हा अद्याप गुन्हा ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे त्यांनी श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार ते स्पष्ट केले पाहिजे.

लडाखच्या हद्दीत चिनी सैन्य बसले आहे. त्यांनी तेथे बांधकाम करून रेड आर्मीचे लाल निशाण फडकवले आहे. ते लाल निशाण आधी उतरवून दाखवा व मगच मुंबईवरील तेजस्वी भगव्याशी नाद करा. असे आव्हान यावेळी शिवसेनेने भाजप नेत्यांना दिले आहे. चिनी सैन्य फक्त डोकलामच्या गावात घुसून थांबले नाही, चिन्यांनी हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करण्याच्या मोहिमा राबविल्याचे दिसत आहे. सिक्कीमच्या सीमेवरही चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. हिंदुस्थानचे सैन्य लाल माकडांना मागे रेटण्यास समर्थ आहेच, पण चिनी साम्राज्यवादाचा धोका वाढतो आहे. अरुणाचल प्रदेशपासून 60 किलोमीटर अंतरावर न्यांगलूमध्ये चिनी सैन्याने इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिट स्थापन केले आहे. पूर्व लडाखच्या डेमचोकमध्ये नियंत्रण रेषेपासून 80 किलोमीटरवर चिनी सैन्याने नव्याने बांधकाम सुरू केले आहे. हिमाचल प्रदेशच्या कौरिकजवळ आणि अरुणाचलच्या फिश टेल 1 आणि 2 जवळ चिनी सैन्य संशयास्पद हालचाली करताना दिसत आहे. उत्तराखंड सीमेनजीक तनजून ला येथे चिनी सैन्याने बंकर्स निर्माण करून बस्तान ठोकले आहे. याचा काय अर्थ घ्यायचा? पाकिस्तानला पुढे करून हिंदुस्थानी लष्कराला त्या सीमांवर गुंतवून ठेवायचे व इतर सीमांना कमजोर करून चिन्यांनी घुसखोरी करायची असे एकंदरीत धोरण दिसते.

चीनने पेच टाकला आहे व आम्ही हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानच्या कैचीत अडकून पडलो आहोत. कश्मीर खोऱयात शांतता नांदायला तयार नाही. सीमेवर धुमशान व आतमध्ये कमालीची खदखद आहे. कश्मिरातील विषय गंभीर खरेच, पण चीनची आक्रमकता व घुसखोरीकडे डोळेझाक करून चालणार नाही. ज्या जोशात पाकिस्तानचे नाव घेऊन दम भरला जातो त्याच पद्धतीने चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज आहे. वाटल्यास श्रीनगर, पाकव्याप्त कश्मीर वगैरेंवर भगवा फडकवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांची नियुक्ती करावी, पण चिनी सैन्य चारही बाजूंनी धडका देत आहे त्यांना कधी रोखणार? चीनचे काय करणार? डोकलाममध्ये चिनी सैन्य घुसले. हिमाचल, अरुणाचल, उत्तराखंडच्या सीमेवर ते घुसण्याच्या तयारीत आहे. लडाखच्या जमिनीवर ते मांड ठोकून बसले आहे. कुणाला त्याची चिंता आहे काय?

संबंधित बातम्या

घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही; लष्करप्रमुखांचा निर्वाणीचा इशारा

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई

(BJP trying attempt to remove saffron flag on BMC, will they the tricolor in Srinagar? : Shivsena)

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.