वडिलांच्या पीएफच्या पैशाचा वाद, मुलांकडून जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बी़ड येथील एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला (Boy attack on mother for money in beed).

वडिलांच्या पीएफच्या पैशाचा वाद, मुलांकडून जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बीड : बी़ड येथील मुलांनी आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला (Boy attack on mother for money in beed). ही धक्कादायक घटना बीडमधील केज इथल्या कानडी माळी या गावात घडली. पीएफच्या पैशांसाठी मुलाने आपल्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आहे (Boy attack on mother for money in beed).

इंदुबाई कुचेकर यांचे पती पोलीस सेवेत होते. काही वर्षांपूर्वी ते बेपत्ता झाले. शोध न लागल्याने त्यांना मयत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात इंदुबाई कुचेकर यांना पीएफचे नऊ लाख रुपये मिळाले. मात्र ही रक्कम आपल्याला मिळावी. यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांनी तगादा लावला होता.

या मिळालेल्या पैशांमधील काही रक्कम मुलांना देऊन देखील, उर्वरित रक्कम मिळावी. यासाठी मुलांनी आपल्या जन्मदात्या आईच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर इंदुबाई यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बीडमधील या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. जन्मदात्या मुलांनीच आपल्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याने सर्वच स्तरातून या मुलांवर संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

संबंधित बातम्या :

लिफ्टच्या बहाण्याने अल्पवयीन तरुणीला किस, आरोपी 5 महिन्यांनी कल्याणमध्ये जेरबंद

मी स्वत: हून माझे जीवन संपवतोय, डोंबिवलीतील पतपेढीच्या मॅनेजरचा कार्यालयातच गळफास

Published On - 9:43 am, Mon, 5 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI