AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे पोलिसांना मोठं यश, सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर राजस्थानात सापडले

पुण्यातील बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांना पुणे क्राईम ब्रांचने राजस्थानात ट्रॅक केलं आहे. (Businessman Gautam Pashankar tracked by Pune Crime Branch)

पुणे पोलिसांना मोठं यश, सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर राजस्थानात सापडले
| Updated on: Nov 24, 2020 | 4:34 PM
Share

पुणे : पुण्यातील बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर (Businessman Gautam Pashankar) यांना पुणे क्राईम ब्रांचने राजस्थानात ट्रॅक केलं आहे. क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी गौतम पाषाणकर हे जयपूरमध्ये असल्याचं म्हटलं आहे. युनिट 1 चे पोलीस निरीक्षक ताकवले यांना गौतम पाषाणकर हे राज्याबाहेर गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपासाची चक्र फिरवली. आपण योग्य दिशेने असल्याचं लक्षात येता, क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी जयपूरकडे कूच केली. पोलीस दुपारी तीनच्या सुमारास गौतम पाषाणकर असलेल्या हॉटेलवर पोहोचले. (Businessman Gautam Pashankar tracked by Pune Crime Branch)

ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानातील जयपूर येथून, त्यांना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. जयपूर येथील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून 64 वर्षीय गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पाषणकर हे बुधवारी 21 ऑक्टोबरला दुपारी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर पडले होते. तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचं सांगून गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता.

यानंतर नातेवाईक, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनीही पाषाणकर यांना अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यानं त्यांची शोधाशोध सुरु झाली. यानंतर याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

ड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात सुसाईड नोट (Businessman Gautam Pashankar tracked by Pune Crime Branch)

गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे बंद लिफाफा दिला होता. घरी गेल्यानंतर शंकर यांच्या पत्नीने उघडून बघितल्यावर त्यात सुसाईड नोट होती.

गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पाषाणकर तणावाखाली होते. ही सुसाईड नोट सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पाषाणकर यांचे कुणाशी वैर होते का? ते कुठे गेले असतील? बेपत्ता होण्यामागचं कारण काय असावं, या सगळ्या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरु होता.

गौतम पाषाणकर बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन?

पाषाणकर यांचा मुलगा कपिल याने यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. पाषाणकर यांच्या गायब होण्यात राजकीय व्यक्तीचा हात असल्याचाही आरोप यावेळी त्याने केला. त्यामुळे पोलीस त्यादिशेनेही तपास करत असल्याची माहिती आहे. कपिल याने पोलिसांची भेट घेऊन काही राजकीय व्यक्तींचा नावेही सांगितल्याची माहिती आहे. (Businessman Gautam Pashankar tracked by Pune Crime Branch)

संबंधित बातम्या :

चिंता वाढली! सुसाईड नोट सोडून गेलेले उद्योजक गौतम पाषाणकर अजूनही बेपत्ता

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन, मुलाकडून धक्कादायक आरोप

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.