डॉक्टरांवर हल्ला केल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास, जामीनही नाही, मोदी सरकारचा मोठा निर्णय

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना तीन महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

डॉक्टरांवर हल्ला केल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास, जामीनही नाही, मोदी सरकारचा मोठा निर्णय
कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच, जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल, तर तुम्ही या रोगाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करु शकता.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचं (Corona Pandemic) मोठं संकट सध्या (Attack On Doctors) देशावर आहे. या संकटात आपले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी एखाद्या सुपरहिरोप्रमाणे आपल्यासाठी लढत आहेत. मात्र, अशा परिस्थितही देशात या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याच्या दुर्दैवी घटना पुढे येत आहेत. मात्र, आता केंद्रातील मोदी सरकारने वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांबाबत कठोर निर्णय घेतला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना तीन महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या (Attack On Doctors) शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत एक अध्यादेश पारित करण्यात आला. याअंतर्गत आता वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. यामध्ये तीन महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी याबाबतची माहिती दिली.

देशात अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. सरकार हे सहन करणार नाही. सरकारने याबाबत एक अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाअंतर्गत शिक्षेची (Attack On Doctors ) तरतूद करण्यात आली आहे, असं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळणार नाही

या अध्यादेशानुसार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळणार नाही आणि 30 दिवसांच्या आत या प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल. एका वर्षाच्या आत यावर निर्णय सुनावण्यात येईल. या प्रकरणी दोषीला 3 महिने ते 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्याशिवाय, गंभीर प्रकरणांमध्ये 6 महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. इतकंच नाही तर, गंभीर प्रकरणांमध्ये 50 हजार ते 2 लाखापर्यंतचा दंड आकारण्यात येईल. सरकारच्या अध्यादेशानुसार, जर कुठल्या वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, तर त्या गाडीच्या बाजार मूल्याच्या दुप्पट भरपाई आकारली जाईल, असं जावडेकरांनी सांगितलं.

डॉक्टरांवर हल्ले केल्यास शिक्षेची तरतूद काय?

  • जामीन मिळणार नाही
  • 30 दिवसात खटल्याचा तपास
  • 1 वर्षात प्रकरण निकाली
  • दोषीला 3 महिने ते 5 वर्षांपर्यंतची शिक्षा
  • गंभीर प्रकरणांमध्ये 6 महिने ते 7 वर्षांपर्यंत शिक्षा
  • गंभीर प्रकरणांमध्ये 50 हजार ते 2 लाखापर्यंतचा दंड
  • वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या गाडीवर हल्ला झाल्यास दुप्पट वसुली

देशात सध्या 723 कोविड रुग्णालयं आहेत, ज्यामध्ये 2 लाख बेड सज्ज आहेत. यापैकी 24 हजार हे अतिदक्षता विभागातील बेड आहेत. सध्या देशात 12 हजार 190 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. आपल्याकडे 25 लाखापेक्षा जास्त एन-95 मास्क देखील आहे, तर 2.5 कोटी अतिरिक्त मास्कचा ऑर्डर देण्यात आला आहे, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेत कोरोनावर बैठक

पंतप्रधानांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यांचा आढावा घेण्यात आला. त्याव्यतिरिक्त देशाच्या आर्थिक स्थितीवरही चर्चा करण्यात आली (Attack On Doctors ).

संबंधित बातम्या :

कोरोनाविरेधातील लढ्यात जगातील टॉप 10 नेत्यांमध्ये मोदी पहिल्या स्थानावर, डोनाल्ड ट्रम्प कितव्या स्थानी?

गुड न्यूज! एका दिवसात 705 ‘कोरोना’ग्रस्त बरे

Corona : चेन्नईतील न्यूज चॅनलमधील 25 जणांना कोरोना, लाईव्ह प्रसारण थांबवलं

Corona : आधी राष्ट्रपती भवन, आता लोकसभा सचिवालयात कोरोनाची एन्ट्री, स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्याला कोरोना

Published On - 5:13 pm, Wed, 22 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI