शिक्षकी पेशाला काळिमा, प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींवर अत्याचार, तक्रारीनंतर अटक

विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी (Chandrapur teacher arrest)  एका महिला महाविद्यालयातील क्रीडा प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

शिक्षकी पेशाला काळिमा, प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींवर अत्याचार, तक्रारीनंतर अटक

चंद्रपूर : विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी (Chandrapur teacher arrest)  एका महिला महाविद्यालयातील क्रीडा प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील महाविद्यालयात हा प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. व्यवस्थापनाने या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी यासंदर्भात दखल घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी काळजीपूर्वक अवघ्या 12 तासात या प्रकरणातील विद्यार्थिनी आणि पालकांचे जबाब नोंदवले.

गेल्या 25 वर्षांपासून या महाविद्यालयातील क्रीडा विषयाचा (Chandrapur teacher arrest) प्राध्यापक वारंवार विद्यार्थिनीसोबत लैंगिक अत्याचार करत आहे. पोलीस तपासात याबाबतची माहिती समोर आली आहे. महाविद्यालय सोडलेली एक विद्यार्थिनी या प्राध्यापकाच्या तक्रारीसाठी पुढे आली असून आता तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांची संख्या दोन झाली आहे.

अत्यंत गुंतागुंतीचे हे प्रकरण चंद्रपूर पोलिस संवेदनशीलतेने हाताळत आहेत. चंद्रपूर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मात्र कमालीची गुप्तता पाळली आहे.

दरम्यान या प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली असून आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याप्रकरणी कलम 376 , पोक्सो आणि SC ST अत्याचार प्रतिबंधक कायदा यासह अन्य कलमे लावण्यात आली आहेत. तसेच अजून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

याच महाविद्यालयातील इतर अन्य विद्यार्थिनी पीडित आहेत का याचाही तपास महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या एका पथकाकडून सुरु आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर शहरातील विद्यार्थिनी आणि पालक यांच्यात चिंता असून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पोलीस करत (Chandrapur teacher arrest) आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI