‘Chandrayaan 2’ ने अंतराळातून टिपलेले पृथ्वीचे नयनरम्य फोटो

भारताच्या चंद्र मिशन ‘चंद्रयान 2’ ने पहिल्यांदा अंतराळातून पृथ्वीचे फोटो पाठवले आहेत. ही माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) ट्विटरवर दिली आहे.

'Chandrayaan 2' ने अंतराळातून टिपलेले पृथ्वीचे नयनरम्य फोटो

मुंबई : भारताच्या चंद्र मिशन ‘चंद्रयान 2’ (Chandrayaan 2) ने पहिल्यांदा अंतराळातून पृथ्वीचे फोटो पाठवले आहेत. ही माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) ट्विटरवर दिली आहे. आज (4 ऑगस्ट) सकाळी इस्रोने फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. चंद्रयान 2 मधील विक्रम लँडरद्वारे पृथ्वीचा सुंदर फोटो क्लिक करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात 22 जुलै रोजी चंद्रयान 2 (Chandrayaan 2) दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी सर्वात शक्तीशाली बाहुबली रॉकेट GSLV-MK3 च्या सहाय्याने अवकाशात झेपावलं. आज 14 दिवसांनी चंद्रयान 2 ने अवकाशात जाऊन पृथ्वीचे फोटो पाठवले आहेत.

चंद्रयान 2 ने पाठवलेले पृथ्वीचे फोटो रोमांचक आणि खूपच सुंदर आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रत्येकजण ईस्रोचे कौतुक करत आहे. तसेच आपल्या देशाबद्दल प्रेम व्यक्त करत आहे.

इस्रोच्या माहितीनुसार, चंद्रयान 2 मधील LI4 कॅमेरातून हे फोटो घेण्यात आले आहेत ज्यामध्ये पृथ्वी निळ्या रंगाची दिसत आहे.

चंद्रयान 2 हे 22 जुलै रोजी प्रक्षेपण झाल्यानंतर चंद्राच्या दक्षिणी ध्रुवापर्यंत पोहचण्यासाठी चंद्रयाण 2 ला 48 दिवसांचा प्रवास करावा लागणार आहे. प्रक्षेपणाच्या 16.23 मिनिटानंतर चंद्रयान 2 पृथ्वीपासून 170 किमी उंचीवर गेल्यावर GSLV-MK3 रॉकेटपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरत होते. इस्रोच्या वैज्ञानिकांनी चंद्रयान 2 च्या लाँचमध्ये अनेक बदल केले होते.

चंद्रयान 2 ची वैशिष्ट्ये

  • चंद्रयान-2 पूर्णपणे भारतीय बनावटीचं, बाहुबली रॉकेटने यशस्वी उड्डाण
  • मिशन चंद्रयान 2 मोहीम दोन महिला शास्त्रज्ञांच्या नेतृत्त्वात यशस्वी
  • दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचण्यासाठी 48 दिवस लागणार
  • 3,844 लाख किमीचं अंतर कापून भारताचं ‘चंद्रयान-2’ चंद्रावर पोहोचणार
  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत एकमेव देश ठरणार
  • दक्षिण ध्रुवावरील रहस्य उलगडणार, चंद्रवरील पाणी, खनिजांच शोध

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI