संयुक्त राष्ट्रात चीनची पत खालावली, मानवहक्क परिषदेच्या निवडणुकीत सर्वात कमी मतं

चीनला संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे.

संयुक्त राष्ट्रात चीनची पत खालावली, मानवहक्क परिषदेच्या निवडणुकीत सर्वात कमी मतं

न्यू यॉर्क : चीनला संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. मानवाधिकार परिषदेचं सदस्य मिळवण्यासाठी झालेल्या निवडणुकीत चीनला अगदी निसटता विजय मिळाला आहे. चीनला 2016 मधील निवडणुकीत पाठिंबा दिलेल्या सदस्य देशांपैकी तब्बल 41 देशांनी यावेळी चीनचा पाठिंबा काढला आहे. तसेच मानवाधिकार परिषदेत नव्याने निवड झालेल्या 15 देशांपैकी सर्वात कमी मतं चीनला मिळाली आहेत (China lose support from 41 nations in United Nations Human Right Council election).

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत एकूण 47 सदस्य आहेत. यापैकी आता 15 सदस्यांची नव्याने निवड झाली. यात चीनला मिळालेली मतं सर्वात कमी आहेत. चीनला या मतदानात केवळ 139 मतं मिळाली. चीनला 2009 आणि 2013 च्या निवडणुकीत 167 मतं मिळाली होती. यावेळी चीनने 2016 मध्ये मिळालेली 180 मतं पुन्हा मिळण्याचा दावा केला होता. मात्र चीनला केवळ 139 मतं मिळाली. यातून आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनची खालावलेली पातळी स्पष्ट होत आहे.

चीनला मानवाधिकार परिषदेचं सदस्य मिळालं असलं तरीही चीनच्या अडचणी सुटलेल्या नाहीत. जवळपास 23 देशांनी ऑक्टोबर 2019 मध्ये चीनकडून झिनजियांगमध्ये केलेल्या अत्याचाराविरोधात मत नोंदवलं होतं. आता हाच आकडा वाढून 40 देशांपर्यंत गेलाय. तसेच चीनमध्ये केवळ झिनजियांगच नाही तर हाँगकाँग आणि तिबेटमध्ये देखील मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आलाय. जूनमध्ये जवळपास संयुक्त राष्ट्राच्या 50 मानवाधिकार कार्यकर्त्यांनी चीनमधील मुलभूत स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी पाऊलं उचलण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मागील 12 महिन्यांमध्ये चीनचा सीमेवरुन अनेक शेजारी राष्ट्रांसोबत संघर्ष सुरु असून त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. भारतासोबत पूर्व लडाखमध्ये, तैवानच्या हवाई हद्दीत युद्धविमानांची घुसखोरी, हाँगकाँगमधील नागरिकांचा असंतोष दाबण्याचे प्रयत्न, अमेरिकेसोबतचं व्यापार युद्ध आणि ऑस्ट्रेलिया व कॅनडासोबतही खनिज तेलाच्या वाहतुकीचा मार्ग असलेल्या दक्षिण चीन समुद्रातील नियंत्रणावरुन चीनचा संघर्ष सुरु आहे.

संबंधित बातम्या :

भारत चीनमधील वाढता तणाव, अमेरिकेचे दोन मंत्री भारत दौऱ्यावर येणार

Powerfull Country : जगातील सर्वात शक्तीशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

Ladkah | भारतीय हद्दीत चीनच्या सैनिकाला पकडले, चौकशी सुरू

China lose support from 41 nations in United Nations Human Right Council election

Published On - 3:00 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI