Corona : चीनमधून आलेल्या 50 हजार पीपीई किट्स सुरक्षा चाचणीत फेल

चीनच्या बड्या खाजगी कंपन्यांनी भारताला ज्या पीपीई किट्स मदत म्हणून दिल्या, त्या गुणवत्ता चाचणीत (China PPE Kits) अयशस्वी ठरल्या.

Corona : चीनमधून आलेल्या 50 हजार पीपीई किट्स सुरक्षा चाचणीत फेल
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 1:45 PM

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं (China PPE Kits) आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सध्या देशात कोरोनाचे 12 हजाराहून जास्त रुग्ण आहेत. यादरम्यान, भारताने चीनला दीड कोटी पीपीई किट्सची ऑर्डर दिली होती. मात्र, चीनच्या बड्या खाजगी कंपन्यांनी भारताला ज्या पीपीई किट्स मदत म्हणून दिल्या, त्या गुणवत्ता चाचणीत (China PPE Kits) अयशस्वी ठरल्या.

दी इकॉनॉमिक टाईम्सनुसार, चीनवरुन 1,70,000 पीपीई किट्स आल्या. यापैकी 50,000 किट्स या गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरल्या आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. शिवाय, 30,000 आणि 10,000 किट्सचे दोन कनसाईन्मेंट आले आहेत, या किट्स देखील गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरल्या आहेत. या किट्स डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट ऑर्गनाईझेशन लेबॉरेटरी ग्वालियर येथे तपासल्या गेल्या.

रिपोर्टनुसार, सीई / एफडीए प्रमाणित (CE/FDAcertified) पीपीई किट्स सरकार चीनकडून खरेदी करत आहेत. मदत म्हणून चीनमधील काही कंपन्यांनी भारताला काही किट्स पुरवल्या. त्यातील काही किट्स या चाचणीत अयशस्वी ठरल्या, आता त्यांचा वापर केला जाऊ शकत नाही, असं एका प्रशासकीय (China PPE Kits) अधिकाऱ्याने सांगितलं.

ज्या किट्स चाचणीत अयशस्वी ठरल्या त्या भारताला चीनच्या कंपन्यांकडून मदत म्हणून मिळाल्या आहेत. तसेच, पीपीई सूटची कमतरता भरुन काढण्यासाठी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून अतिरिक्त 1 लाख सूटची ऑर्डर देण्यात आली आहे. यामध्ये सिंगापूरच्या एका कंपनीचाही समावेश आहे. मात्र, तरीही इतर पीपीई सूट हे चीनकडूनच घेतले जातील.

रिपोर्टनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे सूट भारतात पोहोचतील, अशीही माहिती आहे. तसेच, आणखी ऑर्डर दिले जात आहेत. सरकारच्या अंदाजानुसार, जर भारतात दोन मिलियन पीपीई सूट असतील तर ते भारतासाठी चांगलं असेल. तसेच, घाबरुन जाण्याचं काहीही कारण नाही असंही सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 11,933 वर 

जगभरात आतापर्यंत 20 लाखाहून जास्त लोकांना (Corona Virus Update) कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 लाख 20 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात कोरोनाबाधितांची संख्या 11,933 वर पोहोचली आहे (Corona Virus Update). तर 1,344 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत. तर 392 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

China PPE Kits

संबंधित बातम्या :

लॉकडाऊदरम्यान अनाथ महिलेवर पोलिसांकडून अंत्यसंस्कार, फोटो पाहून अनेकजण भावूक

भाषा शिकण्याच्या अॅपवर ओळख, ‘लॉकडाऊन’मध्ये भारतीय तरुण परदेशी युवतीसोबत लग्नाच्या बेडीत

पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण, 72 जण क्वारंटाईन

तीन महिन्यांच्या बाळाच्या आईला कोरोना, उपचार करणाऱ्या नर्स आईच्या भूमिकेत

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.