Maharashtra corona update | रुग्णांची संख्या 3 हजारांजवळ, कुठे किती कोरोना रुग्ण?

Maharashtra corona update | रुग्णांची संख्या 3 हजारांजवळ, कुठे किती कोरोना रुग्ण?

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 2916 वर पोहचली आहे. आज नव्याने 232 रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात 36 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले (Total Corona Patient in Maharashtra).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 15, 2020 | 8:54 PM

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 2916 वर पोहचली आहे. आज नव्याने 232 रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात 36 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले (Total Corona Patient in Maharashtra). आतापर्यंत राज्यभरातील 295 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत राज्यात 52 हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातील 48 हजार 198 जण कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 2916 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात 69 हजार 738 लोक होम क्वारंटाईनमध्ये, तर 5617 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 9 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी मुंबईचे 2, पुण्यातील 6 तर अकोला मनपा येथील 1 रुग्ण आहे. त्यात 6 पुरुष तर 3 महिला आहेत. आज झालेल्या 9 मृत्यूंपैकी 4 जण हे 60 वर्षांवरील आहेत. 3 रुग्ण हे वय वर्ष 40 ते 60 या वयोगटातील आहेत. दोघेजण 40 वर्षांखालील आहेत. मृत्यू झालेल्या 9 जणांपैकी 6 रुग्णांमध्ये (67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 187 झाली आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण 5394 सर्वेक्षण पथकं काम करत आहेत. त्यांनी 20 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

पुण्यात लॉकडाऊनमध्ये सिगारेट विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई, 39 लाखाचे सिगारेट जप्त

देशभरात 1,344 जणांची कोरोनावर मात, 10,197 रुग्णांवर उपचार सुरु, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

‘महापुरात आम्हाला वाचवलं, महामारीत तुम्हाला वाचवू’, महापुरात बुडालेल्या चिखलीकरांची सरकारला मदत

भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे मराठमोळे संशोधक म्हणतात…..

कोरोना चाचणीच्या सक्तीने गरोदर महिला, डायलेसिस, केमोथेरपीसारख्या उपचारांना अडथळा : देवेंद्र फडणवीस

Total Corona Patient in Maharashtra

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें