जिनपिंग यांच्यासाठी कारही चीनमधून आणली, कशी आहे Hongqi N501?

जिनपिंग (Xi Jinping hongqi n501) भारतात येण्यापूर्वीच कार्गो विमानाने त्यांच्या लक्झरी कारही भारतात दाखल झाल्या.

जिनपिंग यांच्यासाठी कारही चीनमधून आणली, कशी आहे Hongqi N501?
Follow us
| Updated on: Oct 11, 2019 | 8:20 PM

चेन्नई : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कारही चीनहून (Xi Jinping hongqi n501) आणण्यात आली आहे. त्याच कारमधून ते प्रवास करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच जिनपिंगही त्यांची विशेष कार वापरतात. जिनपिंग (Xi Jinping hongqi n501) भारतात येण्यापूर्वीच कार्गो विमानाने त्यांच्या लक्झरी कारही भारतात दाखल झाल्या.

जिनपिंग यांच्या होंगकी या कारला चीनची लिमोझीनही म्हटलं जातं. या आलिशान कारची खिडकी आणि दरवाजे शस्त्रसज्ज असतात. सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असलेल्या या कारची फीचर्स अत्यंत ठराविक लोकांना माहित आहेत. चीनमध्ये होंगकीला रेड फ्लॅग असंही म्हटलं जातं, जे कम्युनिस्ट पक्षाचं चिन्ह आहे.

होंगकी 1958 मध्ये चीनच्या फर्स्ट ऑटो वर्क्स म्हणजेच FAW समूहाने लाँच केली होती. या कारला चीनमधील सर्वात आलिशान कारपैकी एक मानलं जातं. गेल्या अनेक दशकांपासून या कार चीनमध्ये शासकीय दौऱ्यांसाठी वापरल्या जातात.

चीनच्या सर्वात मोठ्या ऑटो कंपनीने Hongqi N501 ही कार खास जिनपिंग यांच्यासाठी तयार केली आहे. या कारची किंमत 5.50 कोटी रुपये आहे. पण इतर फीचर्समुळे या कारची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते.

जिनपिंग त्यांच्या शासकीय दौऱ्यावर नेहमीच होंगकी सोबत नेत नसत. जिनपिंग जेव्हा 2012, 2013 आणि 2015 मध्ये अमेरिका दौऱ्यावर गेले, तेव्हा तिथे प्रसिद्ध कॅडिलॅक कार वापरण्यात आली. तर फ्रान्स दौऱ्यात त्यांनी फ्रान्सची प्रसिद्ध सेडान कार Citroen C6 चा वापर केला. जिनपिंग यांनी ब्रिटेनमध्ये महाराणी एलिजाबेथ यांच्या गोल्ड स्टेट कोच म्हणजेच आठ घोड्यांची सवारीही केली होती.

2014 मध्ये ऑस्ट्रेलियातील जी-20 समिटनंतर जिनपिंग न्यूझीलंड दौऱ्यावर पहिल्यांदाच त्यांची होंगकी कार घेऊन गेले. चीनच्या नेत्यांनी चीनमध्ये तयार झालेल्याच कार वापरायला हव्यात, असं ते 2012 मध्ये त्यांच्या पक्षाला संबोधित करताना म्हणाले होते. चीनच्या कारचा परदेशात प्रचार करणं हा जिनपिंग यांचा उद्देश असल्याचं बोललं जातं.

होंगकी ही अत्यंत शक्तीशाली कार मानली जाते, ज्यामध्ये 402 हॉर्स पॉवरचं टर्बो चार्ज्ड V8 इंजिन आहे. होंगकी कार चीनमधील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे. फक्त 8 सेकंदात शंभर किमीचा वेग पकडण्याची क्षमता या कारमध्ये आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.