AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाथरसप्रकरणी योगी आदित्यनाथांचं मोठं पाऊल, CBI चौकशीचे आदेश

हाथरस प्रकरणात योगी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरसच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हाथरसप्रकरणी योगी आदित्यनाथांचं मोठं पाऊल, CBI चौकशीचे आदेश
| Updated on: Oct 03, 2020 | 10:15 PM
Share

हाथरस : हाथरसप्रकरणात योगी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरसच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. (Cm Yogi Adityanath Orders CBI Inquiry Hathras Case)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी स्वागत केलं आहे. “कोणत्याही यंत्रणेने तपास करावा मात्र आम्हाला न्याय मिळावा. आम्ही न्यायाची वाट पाहतोय”, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील एक-दोन दिवसांत सीबीआयला नोटिफिकेशन मिळेल. त्यानंतर सीबीआय गुन्हा दाखल करेल. गरज पडल्यास सीबीआयची टीम या प्रकरणातील चारही आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबीयांची नार्को टेस्ट करेल.

याअगोदर या प्रकरणाच्या चौकशीसाठी योगी सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीने दोन दिवसांपूर्वी पीडित कुटुंबीयांचे जबाब घेतले होते. आता पुन्हा एकदा एसआयटीची टीम पीडित मुलीच्या घरी पोहचली आहे. पुनश्च एकदा एसआयटीची टीम पीडित कुटुंबाचा जबाब नोंदवणार आहे.

पीडित मुलीच्या वडिलांचा जबाब घेण्यासाठी आम्ही आलो आहे, असं एसआयटी टीममधल्या एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच सीबीआयकडे तपास गेल्यावर देखील आम्ही समांतर चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. आता हा आदेश केंद्राकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकार सीबीआय चौकशीची अधिसूचना जारी करेल.

तत्पूर्वी हाथरस येथे झालेल्या बलात्कार आणि हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. तब्बल पाच तास प्रवास केल्यानंतर संध्याकाळी साडे सातच्या सुमारास राहुल आणि प्रियांका गांधी पीडितेच्या घरी पोहोचले. यावेळी प्रियांका यांना पाहताच पीडितेच्या कुटुंबीयांच्या अश्रूचा बांध फुटला. त्यांचा अक्रोश पाहून प्रियांका यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी पीडितेच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी “न्यायासाठी आम्ही संघर्ष करू. काँग्रेस आणि गांधी कुटुंब तुमच्या सोबत आहेत. तुम्ही एकटे नाहीत”, असं सांगत राहुल यांनी या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला. तब्बल 25 मिनिटे राहुल आणि प्रियांका गांधी पीडितेच्या घरी होते. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचं म्हणणंही ऐकून घेतलं.

अन्यायाविरुद्ध लढणार: प्रियांका

अन्यायाविरुद्ध आम्ही लढतच राहणार आहोत. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देईपर्यंत आमचा संघर्ष राहील. आमचा आवाज कुणीही दाबू शकणार नाही, असं यावेळी प्रियांका गांधी यांनी सांगितलं. आम्ही अन्यायाच्या विरोधात उभं राहू. जोपर्यंत न्याय होत नाही. तोपर्यंत आम्हाला कोणी रोखू शकत नाही. आम्ही लढतच राहू, असा इशाराही त्यांनी दिला.

(Cm Yogi Adityanath Orders CBI Inquiry Hathras Case)

संबंधित बातम्या

न्याय होईपर्यंत लढतच राहू; हाथरसमधून प्रियांका गांधींनी योगी सरकारला ललकारले

LIVE | नोएडा ते हाथरस, राहुल गांधींचा मार्च

Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.