5

हिवाळी अधिवेशनातील खर्च नागपुरातील आरोग्य यंत्रणेला द्या, काँग्रेस आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

हिवाळी अधिवेशनावर होणारा खर्च नागपुरातील आरोग्य यंत्रणेला द्या, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे. (Congress MLA letter to CM uddhav thackeray)

हिवाळी अधिवेशनातील खर्च नागपुरातील आरोग्य यंत्रणेला द्या, काँग्रेस आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 10:42 AM

नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत घेतलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कांग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. हिवाळी अधिवेशनावर होणारा खर्च नागपुरातील आरोग्य यंत्रणेला द्या, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे. (Congress MLA letter to CM uddhav thackeray)

येत्या सात डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. मात्र कोरोनामुळे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी हे अधिवेशन नागपुरात घेऊ नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे हे अधिवेशन मुंबईत घेण्याबाबत चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान हे अधिवेशन मुंबईत होणार असल्याने साधारण 50 कोटी खर्चाची बचत होणार आहे. त्यामुळे हे बचत झालेले 50 कोटी हे नागपुरातील आरोग्य यंत्रणाला द्यावे, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे.

“प्रशासनाने हिवाळी अधिवेशनावर 50 कोटींचा खर्च प्रस्तावित केला होता. पावसाळी अधिवेशन हे तीनच दिवस चालले होते. परिणामी उपराजधानीत हिवाळी अधिवेशन हे किमान दोन आठवडे चालणार असा अंदाज बांधून ५० कोटींचा खर्च प्रस्तावित केला होता. परिणामी 7 डिसेंबर ते 18 डिसेंबरपर्यंत होणारे हे अधिवेशन आता स्थगित झाले असल्याने प्रशासनाचा 50 कोटींचा खर्च वाचला आहे.”

“तो संपूर्ण पैसा आता नागपूर तसेच विदर्बातील रुग्णांच्या आरोग्य व्यवस्थापनावर खर्च करण्यात यावा. येत्या जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही शक्यता लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशनावर खर्च होणारा जवळपास 50 कोटींचा संपूर्ण खर्च आता विदर्भाच्या नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी खर्च करण्यात यावा. ही रक्कम नागपुरातील नवीन रुग्णालय तसेच आरोग्य यंत्रणांवर खर्च करण्यात यावा”, अशी मागणी विकास ठाकरे यांनी  मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान नागपुरात सात डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. पण कोरोनामुळे अधिवेशन होणार की नाही, याचा निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. पण सध्या नागपुरात अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. तरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार निवासात रंगरंगोटी सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे गेल्यावर्षी अधिवेशनासाठी आमदार निवासात रंगकाम करण्यात आले होते. त्यासाठी जवळपास पावणे दोन कोटींचा खर्च करण्यात आला होता. यंदाही यासाठी आठ कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. संच अधिवेशनादरम्यान कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय करण्यात आली आहे.  मात्र हिवाळी अधिवेशन नेमकं कुठे होणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. (Congress MLA letter to CM uddhav thackeray)

संबंधित बातम्या : 

नागपूर अधिवेशनासाठी आमदार निवासात डागडुजी, कोरोना संकटात सरकारची आर्थिक उधळपट्टी?

नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय, निगेटिव्ह प्रेशर रुम म्हणजे काय?

Non Stop LIVE Update
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...
'माझं अर्थखातं टिकेल की नाही माहित नाही', अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
'माझं अर्थखातं टिकेल की नाही माहित नाही', अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा काय?
राज्यात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा काय?