Corona : आधी राष्ट्रपती भवन, आता लोकसभा सचिवालयात कोरोनाची एन्ट्री, स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्याला कोरोना

दिल्लीतील राष्ट्रपती भवनानंतर आता लोकसभा सचिवालयातही कोरोनाने प्रवेश घेतल्याची शक्यता आहे.

Corona : आधी राष्ट्रपती भवन, आता लोकसभा सचिवालयात कोरोनाची एन्ट्री, स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्याला कोरोना
Follow us
| Updated on: Apr 21, 2020 | 1:42 PM

नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रपती भवनानंतर आता लोकसभा सचिवालयातही (Corona In Lok Sabha Secretariat) कोरोनाने प्रवेश घेतल्याची शक्यता आहे. लोकसभा सचिवालयात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तो स्वच्छता विभागात (हाऊस कीपिंग) कामाला होता. सध्या दिल्लीतील राम मनोहर लोहिया (Corona In Lok Sabha Secretariat) रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

लोकसभा सचिवालयापूर्वी राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाने प्रवेश केला होता. या परिसरात राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या कुटुंबासह परिसरातील 125 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेली महिला आणि तिचं कुटुंब हे गावी एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेली होती. कोरोनाग्रस्त महिलेच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

त्यानंतर या महिलेलाही कोरोनाची लक्षणं दिसून (Corona In Lok Sabha Secretariat) आली आणि तिची कोविड-19 चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तिलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र, तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या कोविड-19 चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला.

देशात कोरोनाची स्थिती काय?

कोरोनामुळे आतापर्यंत देशात 590 जणांचा बळी गेला आहे. तर देशात कोरोनाबाधितांची संख्या ही 18 हजार 600 वर पोहोचली आहे. आतापर्यंच 590 जण बरे होऊन घरीही गेले आहेत. कोरोना संसर्गाचा धोका पाहता केंद्रीय मंत्रालयं, विभाग आणि कार्यालयांमधील कॅन्टीन आधीच बंद करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजाराच्या मार्गावर

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या 4,666 कोरोना रुग्ण आहेत. तर 232 जणांना कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्यात संपूर्ण संचारबंदी असूनही कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे.

Corona In Lok Sabha Secretariat

संबंधित बातम्या :

Corona Update : देशभरात 2546 रुग्णांची कोरोनावर मात, गेल्या 24 तासात 1553 नवे बाधित

मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्जवरील जीएसटी कर रद्द करा, राहुल गांधीची मागणी

Corona : भोपाळमध्ये 9 दिवसांच्या बाळाला कोरोना, प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांकडून संसर्ग

देशभरात ‘ग्रीन झोन’मधील जिल्ह्यात कोणकोणत्या क्षेत्रात अंशत: सूट?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.