AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्लिगीमुळे 14 राज्यात धाकधूक, तब्बल 647 जणांना कोरोनाची लागण

दिल्लीतील तब्लिगी जमातच्या तब्बल 647 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात 14 राज्यांच्या नागरिकांचा समावेश आहे (Corona infection to peoples from Tablighi Jamaat)

तब्लिगीमुळे 14 राज्यात धाकधूक, तब्बल 647 जणांना कोरोनाची लागण
| Updated on: Apr 03, 2020 | 7:38 PM
Share

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने आरोग्य आणीबाणी तयार झाली आहे. आतापर्यंत जगभरात 10 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच 45 हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दिल्लीतील तब्लिगी जमातच्या तब्बल 647 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात 14 राज्यांच्या नागरिकांचा समावेश असल्याने या राज्यांमधील आरोग्य यंत्रणांची धाकधूक वाढली आहे (Corona infection to peoples from Tablighi Jamaat).

दरम्यान, गृहमंत्रालयाने भारतात पर्यटक व्हिसावर आलेल्या आणि तब्लिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 960 परदेशी नागरिकांना काळ्या यादीत टाकलं आहे. तब्लिगी जमात कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या देशात परतलेल्या सुमारे 360 परदेशी नागरिकांनाही अशाच प्रकारे काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि परदेशी नागरिक कायद्या अंतर्गत 960 परदेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. यावेळी हद्दपारीचा प्रश्नच उदभवत नाही. जेव्हा हद्दपार करायची असेल तेव्हा आदर्श आरोग्य नियमावलीनुसारच तशी कारवाई केली जाईल, अशी माहिती गृहमंत्रालयाने पत्रकारांना दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 586 पर्यंत पोहचला आहे. यातील 156 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची सद्यस्थितीत सक्रीय प्रकरणे 2088 इतकी आहेत. भारतात आतापर्यंत कोरोना संसर्गाने 56 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हेच गांभीर्य लक्षात घेऊन सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. आज या लॉकडाऊनचा दहावा दिवस आहे.

दरम्यान, सरकारने दिलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये मागील 24 तासात देशभरात 328 कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. यात दिल्लीत एका दिवसात वाढलेल्या 141 प्रकरणांचा समावेश आहे.

कोरोना संसर्गाचं निदान करण्यासाठी देशात 182 प्रयोगशाळा, 130 शासकीय प्रयोगशाळांचा समावेश करण्यात आला. गुरुवारी (2 एप्रिल) 8000 नमुने तपासण्यात आले आहेत. आतापर्यंतची भारतातील तपासणीची ही सर्वोच्च संख्या आहे. आतापर्यंत देशात 66,000 नमुने तपासण्यात आले आहे, अशीही माहिती देण्यात आली.

संबंधित बातम्या :

Corona infection to peoples from Tablighi Jamaat

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.