वडापावच्या गाडीवरुन वाद, पिंपरीत 22 वर्षीय तरुणाची हत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. भाजप नगरसेविकेच्या मुलाने या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे

वडापावच्या गाडीवरुन वाद, पिंपरीत 22 वर्षीय तरुणाची हत्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे (Pimpari 22 Year Old Boy Murder). भाजप नगरसेविकेच्या मुलाने या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 5 जाणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर भाजप नगरसेविकेचा मुलगा मात्र फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत (Pimpari 22 Year Old Boy Murder).

वडापावच्या गाडीवरुन झालेल्या वादात या तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. शुभम नखाते असं हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे.

हत्या झालेला शुभम नखाते आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्यात काही दिवसांपूर्वी वडापावच्या गाडीवरुन वाद निर्माण झाला होता. त्यातून अनेकदा त्यांची किरकोळ भांडणं देखील व्हायची. मात्र, काल (19 ऑगस्ट) दुपारी साडे चारच्या सुमारास या दोघांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद झाला आणि हा वाद मारामारीपर्यंत गेला. त्यावेळी शुभमने आरोपी ज्ञानेश्वरला पाटील याला जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर ज्ञानेश्वरने आपल्या पाच साथीदारांच्या कानावर हे प्रकरण टाकले आणि हे प्रकरण त्याभागातील भाजप नगरसेविका सुनिता तापकीरांचा मुलगा राजपर्यंत पोहचले. राज तापकीर याने हे प्रकरण शांत करण्यासाठी शुभमला नखाते याला फोन केला आणि प्रकरण शांत करण्यासाठी बोलावून घेतलं.

राज तापकीर आणि शुभम नखाते हे पाहुणे असल्याने शुभमच्या मनात कोणती शंका उपस्थित झाली नाही त्यामुळे शुभम साडे आठच्या सुमारास धोंडिराज मंगल कार्यलयात आला. मात्र, तिथं आल्यानंतर पुन्हा वादंग झाला आणि शुभमवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमचा जागीच मृत्यू झाला.

ही हत्या झाल्यानंतर तत्काळ वाकड पोलिसांनी ही हत्या करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून अधिकची माहिती घेत इतर दोघांना असे एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. राज तापकीर आणि त्याच्या आणखी एक साथीदार फरार असल्याने त्यांचा शोध सुरु आहे.

Pimpari 22 Year Old Boy Murder

संबंधित बातम्या :

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची आत्महत्या, खारघरच्या क्वारंटाईन सेंटरमध्येच गळफास

विवाहितेकडे लग्नाचा हट्ट, नकार दिल्याने हत्या, झाडाला लटकवून आत्महत्येचा बनाव रचणारा गजाआड

Published On - 7:02 pm, Thu, 20 August 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI