AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मगरीकडून मे महिन्यातच अतिवृष्टी, महापूर येण्याचे संकेत, मानव प्राणी संघर्षात त्याकडे दुर्लक्ष : प्राणीतज्ज्ञ

सांगलीतील आमणापूर येथील पीर परिसरात, काळ्या ओढ्याजवळ मगरीने वीण उंचावर घालून चांगला पाऊस आणि महापूराचा संकेत दिले. मात्र, माणसाने या संकेतांकडे दुर्लक्ष केले, असं मत निसर्गप्रेमी संदीप नाझरे यांनी व्यक्त केलं.

मगरीकडून मे महिन्यातच अतिवृष्टी, महापूर येण्याचे संकेत, मानव प्राणी संघर्षात त्याकडे दुर्लक्ष : प्राणीतज्ज्ञ
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 10:40 AM
Share

सांगली : घराच्या छतावर मगर, रस्त्यावर मगर, शिवारात मगर, स्वच्छ पाण्यात तोंडातून मुलीला घेऊन जाणारी मगर. 23 जुलैचा महापूर ओसरू लागताच सांगलीत अजस्र मगरीचे अनेक व्हिडीओ समाज माध्यमातून झळकले. यात एखाद्या ठिकाणी खरोखरच मगरीने हल्ला केला असल्याचं समोर आलं नाही. कारण प्रलयंकारी महापूराने सैरभैर झालेल्या मगरी स्वतःचा जीव वाचवत आहेत. मात्र, यामुळेच या मगरी समाज माध्यमात अनेकांच्या स्टेटसवर झळकल्या. यानंतर नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर मानव-मगर संघर्ष निर्माण करण्यात आला.

साधारण मे-जून हा मगरीचा विणीचा हंगाम. या काळात ती नदीकाठी असणाऱ्या जमिनीमध्ये खड्डा करुन आपली अंडी घालून पूरत असते. त्यानंतर अंडी उबून आतून पिल्लं ओरडेपर्यंत मगर थांबून वाट बघते. पिलांचा आवाज आला की ती जागा उकरून अंडी फोडून पिलांना घेऊन जाते. यावर्षी मगरींनी आपली वीण उंचीवर घातली. आमणापूर येथील पीर परिसरात, काळ्या ओढ्याजवळ मगरीने वीण उंचावर घालून चांगला पाऊस आणि महापूराचा संकेत दिले. मात्र, माणसाने या संकेतांकडे दुर्लक्ष केले, असं मत निसर्गप्रेमी संदीप नाझरे यांनी व्यक्त केलं.

प्राणीतज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय?

कोणताही वन्यजीव हा विणीच्या काळातच अधिक आक्रमक असतो. तसेच मगरी एप्रिल ते जून दरम्यान आक्रमक असतात. इतरवेळी ती तिच्या अधिवासात सुस्त असते. मात्र माध्यमांनी निर्माण केलेल्या संघर्षामुळे आपण तिच्या संकेताकडे दुर्लक्ष केले आहे, असं मत प्राणीतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

Video | 8 फुटांची मगर थेट घरात घुसली, नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !

Video | वारणेकाठी आढळली तब्बल 12 फुटांची अजस्त्र मगर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Sangli | सांगलीत मगरीचं दर्शन, मगरीला पकडण्यात प्राणीमित्रांना यश

व्हिडीओ पाहा :

Crocodiles give signal of Heavy rain and flood in may 2021 claim in Sangli

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.